प्रत्येक दिवस कालच्यासारखा;
मारून- मुटकून काढल्यासारखा.
भरीस भर प्रत्येकाचा, चेहरा
तिच्या चेहर् यासारखा. खोल
जाऊन रुतला काटा, नाही सहज
काढण्यासारखा. काय सांगू कसा
जळलो? स्वतःच आग लावल्यासारखा.
वर छाया, आत शून्य प्रत्येकजण
आरश्यासारखा. घाव स्त्रवतो
आजसुद्धा, अगदी आत्ता
घातल्यासारखा. "अनिरुद्धा" कधी
हसशील, मनापासून;
हासल्यासारखा?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Wednesday, April 20, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment