स्वप्नामधली माझी आहे
रिमझिमणारी वा-यावरती झुलता
झुलता दरवळणारी पा-यासम ती
चंचल आहे मी अनुभवले मुक्त नदी
ती बारा महिने खळखळणारी
पांघरले मी श्वास तिचे अन
त्याच क्षणाला भरली माझी खोल
जखमही भळभळणारी शांत पहाटे
गोड सुरावट ऐकू येई कोकिळकंठी
तीच असावी गुणगुणणारी
असण्याचा संकेत मिळे पण दृष्य
नसे ती मंद हवा ती पानांमधुनी
सळसळणारी माफक आहे आशा देवा आज
हवी मज माझ्यामधल्या
प्रतिभेवरती मरमिटणारी ओळख
नसता आज गवसली "निशिकांता"ला
गजलेसाठी हसरी बुजरी
थरथरणारी निशिकांत देशपांडे
मो.न. ९८९०७ ९९०२३ E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2635
Friday, April 29, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment