Saturday, April 16, 2011

तुझे वार थोडे.. : उर्जायन

* तुझे वार थोडे..*
* तुझे वार थोडे , हळुवार
व्हावे . कितीदा गळ्याने
सुरीला पुसावे .
* तुला पत्र आता असे मी लिहावे .
जसे लेखणीला कुणी रक्त
द्यावे !
* किती चोरले तू गळे कोकिळेचे ?
तुझा कंठ व्हाया स्वरांनी
झुरावे !
* कसे प्रेम असते? कसा जीव जातो?
अरे मूर्ख श्वासा तुला ना
कळावे .
* उभा जन्म झाला भ्रमाची
भ्रमंती .. तुझ्या सावलीला
कितीदा धरावे ?
* तुझे धुंद डोळे .. जशी
मद्यशाला . तृषेनेच आता तुझे
ओठ व्हावे !
* गडे सांत्वनांना दिली तू
प्रतिष्ठा . तुझ्या आसवांची
रुमालास नावे !
* तुझे हात नाजूक .. मउ रेशमाचे ,
सखे तू फुलांना अता
कुस्करावे!
* तुला 'सोसण्याने'मिळे मज
प्रतिष्टा. जुने घाव माझे कधी
ना भरावे !
* उन्हाच्या झळांशी लळा
लागल्यावर .. तुझ्या सावलीला
कशाला बसावे ?
* गझलकार - रवीप्रकाश संकलन -
उर्जायन.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2625

No comments:

Post a Comment