Thursday, April 7, 2011

जखमा जुन्या (गझल ) : मनिषा नाईक.

*जखमा जुन्या (गझल ) का मोगरा
उशाला, तू माळतेस आता काळीज
आठवांनी, का जाळतेस आता मोडून
स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस
आता गेला निघून गेला तांडा
नव्या दिशेला त्याच्या खुणा
कशाला सांभाळतेस आता काळास
दोष नाही वेळाच थांबलेल्या का
जाहल्या चुकांना मग चाळतेस
आता सारे तुझेच होते झोळीत जे
मिळाले डोळ्यातले झरे का ते
गाळतेस आता आक्रोश या 'मनी'चा
कोणास ना कळाला जखमा जुन्या
कशाला तू पाळतेस आता मनिषा
(माऊ)....... दि .७.०४.२०११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2613

*

No comments:

Post a Comment