Friday, April 29, 2011

आईच्या पोटात कधी हा भेद कुणी का शिकले? : विजय दि. पाटील

पायाचाही विचार व्हावा हेच
कधी ना सुचले मनाप्रमाणे
चढवित गेलो, मजल्यांवरती मजले
तू, मी, माझे, तुझे, जाणले जन्म
घेतल्यापासुन आईच्या पोटात
कधी हा भेद कुणी का शिकले?
पाठशिवणिचा खेळ संपला शिशीर
वसंतातला ऋतुचक्राला छेद देत
ते झाड आज कोसळले काय मनाला
लावुन घेऊ, ध्येय गाठले नाही
बघू आणखी दिवस जाउ देतो...जमले
तर जमले! 'कणखर'तेचे शिखर मनाला
गाठुन देण्या जगतो नकोच
माझ्या भलावणीला ठिकाण
अधलेमधले ----------------------------------- विजय
दिनकर पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2636

No comments:

Post a Comment