Wednesday, April 13, 2011

नवा घाव : संतोष कसवणकर

जरा साकळू दे, नवा घाव आहे पुढे
वेदनेचा,नवा गाव आहे अता घे
भरूनी, इथे श्वास ताजा
विहरण्यास तेथे,कुठे वाव आहे
कशी घातली तू, बळेची शपथ ती तरी
हे तुझे येथ, घुमजाव आहे कसा
बापडा रंक, झोपे भुकेला इथे
ढेकरातच,कुणी राव आहे कसे
नित्य येथे, उलटतीच फासे कळेना
कसा हा, तुझा डाव आहे कधी मोकळे
श्वास, घेशील का तू? तुझ्याच
परिघांती, तुझी धाव आहे कुठे
पंख पसरू, मला सांग येथे
पुरेशा नभाची, मला हाव आहे
फोन.....9821273412
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment