काठी, परशू, भाला, सारे जमवत आहे
मी बेरड होण्याचे पक्के ठरवत
आहे माझ्या सज्जनतेची केवळ
चेष्टा झाली फांदेबाजी माझी
बक्षिस मिळवत आहे आयुष्याची
ऐरण झिजली असताना मी कुठल्या
विश्वासाने सळई बडवत आहे?
तकलादू धाग्यांनी विणले माझे
जीवन पडल्यापडल्या जागोजागी
उसवत आहे मी घाबरलो येथे येइल
त्या दु:खाला जो जो 'कणखर' झाला
तो तो मिरवत आहे -------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2606
Tuesday, April 5, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment