वार झाले खूप मजवर मी तरी
जगतोच आहे कोरड्या डोळ्यातली
मी आसवे पुसतोच आहे लाख केला
मी नव्याने जीवनाचा
श्रीगणेशा आठवांना जीवघेण्या
ओंजळी भरतोच आहे हरवले घरपण
घराचे मान्य हे मजला तरीही रोप
तुळशीचे बनूनी अंगणी डुलतोच
आहे पर्ण मी झडलो तरीही वृक्ष
तो माझा नव्हे का ? अन्न
पुरवाया तरूला मी तळी कुजतोच
आहे चंद्रभागेच्या तिरावर
नाचतो भक्तासवे तो भक्त कुणबी
फास घेता मख्ख तो बघतोच आहे
लाखदा ललकारले पण हूल का देतोय
मृत्यू ? चक्रव्युह असते मराया
त्यात मी शिरतोच आहे अंत
कोणाचा कसा ही गौण वाटे बाब
मजला व्हायचे निर्माल्य अंती
मी तरी फुलतोच आहे ईश्वराला
मानतो मी आसरा हरल्या मनांचा
तो असो अथवा नसो, पण रोज मी
पुजतोच आहे दु:ख मी अन वेदना मी
वेगळा "निशिकांत" कोठे ? सर्व
विश्वाला पुरूनी मी असा उरतोच
आहे निशिकांत देशपांडे मो.नं.
९८९०७ ९९०२३ E Mail :-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, April 16, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment