Tuesday, April 12, 2011

एखादा तरी... : मी अभिजीत

आज श्वासांनो भरा हुंकार
एखादा तरी चेतवा राखेतुनी
अंगार एखादा तरी कोठवर टिकणार
कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार
एखादा तरी साथ दे वा स्वप्न दे
वा आठवांचा गाव दे दे जगायाला
मला आधार एखादा तरी जीवनी झाले
किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शू दे गंधार
एखादा तरी रिक्त हाताने कसा
परतू तुला भेटून मी काळजावरती
हवा ना वार एखादा तरी चालली
आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा
तरी आस ही ठेऊन हल्ली दैव गझला
वाचते शब्द माझा यायचा लाचार
एखादा तरी -- अभिजीत दाते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2619

No comments:

Post a Comment