Wednesday, April 6, 2011

मावळाया लागलो : निशिकांत दे

उगवणे भाग्यात नव्हते
मावळाया लागलो वेदनांचे गाव
जिकडे मी उडाया लागलो ओळखीची
वाटली ती भेटता हसली तशी बालपण
मी ताण देउन आठवाया लागलो देव
कोणा पावलेला पाहिला नाही कधी
पण तरीही विठ्ठला मी आळवाया
लगलो देणग्या देऊन मोठ्या
स्वार्थ मीही साधला भूक माझी
मुखवट्याची भागवाया लागलो
उच्चभ्रू मीही असावे मोह पडता
वाटते शुध्द माझ्या आसवांना
बाटवाया लागलो ओंगळांना
झगमगाटी मध्यवर्ती स्थान अन
मी वृथा अंधार सारा पांघराया
लागलो तो पुढारी भेटता मज
भ्रष्ट झालो मी असा ! चावडीवर
लोकशाही नागवाया लागलो
भ्रष्ट नेता काल मरता जाहली
इतकी खुशी ! प्रेतयात्री मीच
हलगी वाजवाया लागलो संपली
यात्रा जगीची जाणले
"निशिकांत"ने भैरवीच्या आर्त
ताना आळवाया लागलो निशिकांत
देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३ E
Mail:- nishides1944@yahoo.com प्रतिसादाची
अपेक्षा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment