कै. भटसाहेबांच्या "माझ्या
धुळीचे शेवटी येथे किती कण
राहिले?" या गझलेतील "अवघ्या
विजा मी झेलल्या, सगळी उन्हे
मी सोसली" या ओळीवर रचलेली
तरही गझल. अवघ्या विजा मी
झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
बाकी न काही राहिले सगळी
सुखेही भोगली... वेचून जखमा
येथल्या विश्वात दुसर्या
चाललो हसलो असे जखमांवरी की
आंसवेही गोठली तो मोगरा
झुंजार, सगळे वार त्याने झेलले
वार्यासवे बोलायची त्याची
सवय ना मोडली हसले जरी
माझ्यावरी आयुष्यही माझे
किती, मी वेदनांची साथ या
जन्मात नाही सोडली.. आता नको
चर्चा जुन्या; वाटा नव्या
शोधायच्या नाती नव्या मनुशी
पुन्हा, मीही नव्याने जोडली !
विशाल...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, April 19, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment