आज बागेमध्ये मोग-यांचा सडा
गंधतो अंगणा पावलांचा सडा
चांद होता जरा काल राती खुळा
केव्हढा सांडला चांदण्यांचा
सडा वाहतो गार वारा शहारा उठे
लाज शृंगारण्याच्या क्षणांचा
सडा रूप ते पाहुनी आरसे दंगता
भंगले, वेचतो आज त्यांचा सडा
ही नशा राहु दे झिंगलो मी असा
पापणी पेलते मोतियांचा सडा
शायरी खुद्द ती, शब्द होते
तिचे गुंफतो "जीत" त्या
आठवांचा सडा ....रसप.... (रणजित
पराडकर)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, May 7, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
दिलेल्या दुव्यावर ही रचना उपलब्ध नाही.
ReplyDelete