Monday, September 6, 2010

''चेहरा'' : कैलास

''चेहरा'' चेहर्‍याची चांगली ही
रीत नाही अंतरीचे दु:ख तो
लपवीत नाही साहिल्या इतक्या
झळा या जीवनाच्या हाय ! आता
आगही जाळीत नाही वाटण्या आलो
जगाला मोद किंतू सौख्य इतुके
माझिया झोळीत नाही चालतो मी
आजही नाकासमोरी पण इथे रस्ते
सरळ ओळीत नाही सौख्य अज्ञाना
मधे ही गोष्ट सच्ची का तुला
"कैलास" हे माहीत नाही?
डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment