Thursday, September 30, 2010

''भारतीय'' : कैलास

उत्तरेचे, दक्षिणेचे,रंक आणि
राव येथे शोधुनीही सापडेना
भारताचे नाव येथे मी मराठी,तो
बिहारी,भारताचा ना कुणी ही
अस्मितेचा हर
प्रदेशी,रंगलेला डाव येथे
घालुनी खड्ड्यात्,देशाला,कसे
निर्लज्ज नेते, ''मीच तारणहार
आता'' आणती बघ आव येथे ''धर्म'' हे
चलनी इथे नाणेच वाजे खणखणा की,
''झामुमो''च्या ही सदस्यालाच
कोटी भाव येथे ज्या रथाचा
सारथी , फुंकून ठेवी
अस्मितेला, आजही ''कैलास'' धावे
तोच रथ भरधाव येथे. डॉ.कैलास
गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment