Monday, September 27, 2010

या जगाला "मी" कुठे ठाऊक आहे ?............. : मयुरेश साने

बासरीला फूंकरीची भूक आहे
सावळ्याच्या अंतरी ती मूक आहे
चातकाच्या लोचनी पाऊस दाटे
सोबतीला कोकिळेची कूक आहे
सोनियाचा देव गाभारा रिकामा
पायरीशी थांबला भावूक आहे आज
"ने -त्यान्नो" जराशी चाड ठेवा
लेखणीच्या आतही बंदूक आहे
रोषणाईची दिवाळी खूप झाली वीज
ही या अंबरी अंधूक आहे दाद
गाण्याला मिळाली - ना इथे ही ती
निराळी "मैफलीची" चूक आहे
वेदनेला मोकळे केले तरीही
काळजाला काळजीची हूक आहे लाख
गोंजारा जगाच्या " मी " पणाला या
जगाला "मी" कुठे ठाऊक आहे ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment