Saturday, September 25, 2010

असं का गणेशा? : शान्ताराम

मोदक, बिल्व, दूर्वा वाहुनि
घालति भक्त साकडे गणेशा.
वाहुनि चन्दन पुष्प सुवासित
करती धूप राखडे गणेशा.
अष्टोत्तरशतसहस्र जपती
नावांचे आकडे गणेशा. घेती
प्रसाद ओवाळुनि निरांजन
काकडे गणेशा. देत निमन्त्रण
पुन्हा यायला नेती तलावाकडे
गणेशा. निरोप घेवुनि भक्तांचे
जातांना मातेकडे गणेशा,
निर्माल्य न उन्दीर सोडुनी का
नेले भक्तांसि देवाकडे गणेशा?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment