Friday, September 3, 2010

जगून घे : आदित्य_देवधर

आता जरासे हसून घे श्वासांस
थोडे जगून घे जाता निघोनी
लवाजमा मागून त्यांच्या रडून
घे मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे क्रांती
जिथे पेटुनी उठे ज्वालांत
तेथे जळून घे जाशी करायास
सांत्वना थोडे स्वत:चे करून घे
स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे आता
कितीसे जगायचे पुन्हा
नव्याने मरून घे प्राणांस
त्यागून शेवटी वाटेल तैसे
जगून घे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2316

No comments:

Post a Comment