Tuesday, September 28, 2010

कळले नाही : क्रान्ति

फुलांतला का गंध रुतावा, कळले
नाही व्यथेसवे का स्नेह
जुळावा, कळले नाही अधांतरी अन्
एकाकी टाकून मला का हात तुझा
हातून सुटावा, कळले नाही
गुन्हेगार तो असूनही
'बा-इज्जत' सुटला! कुणी, कुठे
दडपला पुरावा, कळले नाही
अजाणता मी त्याच्या वाटा
तुडवित गेले, कसला चकवा, कसा
भुलावा, कळले नाही अनोळखी मी,
मलाच नाही कधी गवसले, तुला कसा
लागला सुगावा, कळले नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2336

No comments:

Post a Comment