Monday, September 20, 2010

जरासा त्रास होतो : ह्रषिकेश चुरी

कुणाचा भास होतो जरासा त्रास
होतो तुझ्या रानात माझा बरा
वनवास होतो जशी तू देव होते
तशी आरास होतो रुपेरी
पैंजणांचा रुपेरी फास होतो
तुझ्याशी भांडतो पण मलाही
त्रास होतो कुणाचे अन्न उष्टे,
कुणाचा घास होतो जनांची चाकरी
पण मनाचा दास होतो कशाला
'क्लास' लावू? तसा मी पास होतो
तुझा उपयोग आता मला गाण्यास
होतो --- ह्रषिकेश् चुरी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2330

No comments:

Post a Comment