Monday, September 13, 2010

वाटे पुन्हा पुन्हा.. : बहर

रस्ता असा चुकावा वाटे पुन्हा
पुन्हा.. मुक्काम हाच व्हावा..
वाटे पुन्हा पुन्हा! चोरून
भेटलो अन वचने किती दिली... तो
काळ आज यावा, वाटे पुन्हा
पुन्हा.. सांगूनही जगाला, पटले
कुठे इथे? सोडून नाद द्यावा,
वाटे पुन्हा पुन्हा! मी चकवले
व्यथेला, फसलीच खास ती! काढेल
पण सुगावा, वाटे पुन्हा
पुन्हा!! ईमान राखणारा पाऊस हा
गडे.. आता फितूर व्हावा, वाटे
पुन्हा पुन्हा! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2323

No comments:

Post a Comment