Monday, September 13, 2010

भांडेल कोण आता? : विजय दि. पाटील

मी कोण, कोण तू हे, मांडेल, कोण
आता? आयुष्य, नीटसे हे, वाचेल
कोण आता? केव्हांच जाहलो मी,
प्रेमास पारखासा बेधुंद
मैफलींना, जागेल कोण आता? तू
दूर जावयाचा, निर्धार दाखवीशी,
मी स्तब्ध!, आपलेसे, वागेल कोण
आता? माझ्याच भावनांची, होळी
कशी करू मी? जाळीत जीव
गेली....ऐकेल कोण आता? अर्ध्यात
छाटलेल्या, पंखांत जोर नाही
घेऊ कशी भरारी, सांगेल कोण आता?
हातात काय नाही, झाली रिती
शिदोरी झोळीत चार दाणे, टाकेल
कोण आता? प्रारब्ध सावजाचे,
होणे 'शिकार' आहे आडून
पारध्याला, चकवेल कोण आता?
धाकात राहतो मी, अख्खा तुझ्या
अयुष्या! अस्तित्व दाखवाया,
भांडेल कोण आता?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment