आरशालाही स्वत:चा अर्थ कळला
पाहिजे चेहरा माझा खरा मज
त्यात दिसला पाहिजे पावलांना
वाट कळते, एवढे नाही पुरे त्या
धुळीला हा प्रवासीही उमगला
पाहिजे पाठ फिरवुन जायला अन्
तू सखे वळशीलही पावलांनाही
तुझा निर्धार पटला पाहिजे
वाहताना आसवांना एक आडोसा हवा
(आजच्याइतकाच पाउस रोज पडला
पाहिजे) वाट दु:खाची कितीही,
संपुनी जाईलही फक्त दु:खानेच
माझा हात धरला पाहिजे लेखणी
बहरून यावी हे तुला जर वाटते-
काळजाच्या वेदनांचा संप
मिटला पाहिजे जाणिवा हृदयास
भिडल्या- ओळखावे हे कसे?
आपुल्या डोळ्यांतला तो मेघ
भरला पाहिजे आटला नाही कधीही
आठवांचा हा झरा आत माझ्या खोल
त्याचा उगम असला पाहिजे -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Tuesday, September 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment