Monday, February 28, 2011

हो गझल गैरमुसलसल आता.. : बेफिकीर

हो गझल गैरमुसलसल आता कोरडे
वागणे बदल आता चेहरा वेगळीकडे
केला घेतली आपली दखल आता एक
उडता कटाक्ष झिलमिलला ओळ
रचणार मी तरल आता मी तुझा वा
कधी स्वतःचा मी सारखे हेच
दलबदल आता केस कानावरून मागे
घे हाच मुद्दा पुढे ढकल आता हे
ठरवताच लाघवी हसते 'आज करतोच
बेदखल आता' चारचौघांपुढे विषय
आला काय देशील तू बगल आता
ढुंकुनी पाहणार नाही मी प्रेम
झाले जरी सफल आता एक पर्याय
राहिला नाही चालणे मजल दरमजल
आता सारखे हेच वाटते येथे
'संपली आपली सहल आता' 'काय समजून
घ्यायचे नक्की' काय होईल ही
उकल आता आजही गाजले इतर सारे
जाउदे 'बेफिकीर' चल आता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2567

हो गझल गैरमुसलसल आता.. : बेफिकीर

हो गझल गैरमुसलसल आता कोरडे
वागणे बदल आता चेहरा वेगळीकडे
केला घेतली आपली दखल आता एक
उडता कटाक्ष झिलमिलला ओळ
रचणार मी तरल आता मी तुझा वा
कधी स्वतःचा मी सारखे हेच
दलबदल आता केस कानावरून मागे
घे हाच मुद्दा पुढे ढकल आता हे
ठरवताच लाघवी हसते 'आज करतोच
बेदखल आता' चारचौघांपुढे विषय
आला काय देशील तू बगल आता
ढुंकुनी पाहणार नाही मी प्रेम
झाले जरी सफल आता एक पर्याय
राहिला नाही चालणे मजल दरमजल
आता सारखे हेच वाटते येथे
'संपली आपली सहल आता' 'काय समजून
घ्यायचे नक्की' काय होईल ही
उकल आता आजही गाजले इतर सारे
जाउदे 'बेफिकीर' चल आता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

एकदा तरी : मिल्या

मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी
दिलेल्या मिसर्‍यावर
लिहीलेली ही तरही गझल लढेन
षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
*ठरेन या जगात मी महान एकदा तरी*
पहाड, जंगले, नद्या उदास सर्व
भासती वळून पाहशील का निदान
एकदा तरी? ढगांवरी जळून चंद्र,
वायुला विचारतो 'मिळेल का मला
तुझे विमान एकदा तरी?' मदार
केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी
कळेच ना कशामुळे क्षणात
बिनसते तुझे करेन मी जगा तुझे
निदान एकदा तरी नकोस तू ! मला
तुझा पुरेल फक्त भास ही शमेल
मृगजळामुळे तहान.... एकदा तरी
करायचाय एकदा असह्य छळ तुझा
मना बनेल काय देह अंदमान एकदा
तरी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2566

एकदा तरी : मिल्या

मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी
दिलेल्या मिसर्‍यावर
लिहीलेली ही तरही गझल लढेन
षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
*ठरेन या जगात मी महान एकदा तरी*
पहाड, जंगले, नद्या उदास सर्व
भासती वळून पाहशील का निदान
एकदा तरी? ढगांवरी जळून चंद्र,
वायुला विचारतो 'मिळेल का मला
तुझे विमान एकदा तरी?' मदार
केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी
कळेच ना कशामुळे क्षणात
बिनसते तुझे करेन मी जगा तुझे
निदान एकदा तरी नकोस तू ! मला
तुझा पुरेल फक्त भास ही शमेल
मृगजळामुळे तहान.... एकदा तरी
करायचाय एकदा असह्य छळ तुझा
मना बनेल काय देह अंदमान एकदा
तरी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, February 25, 2011

कधी कधी : केदार पाटणकर

कधी कधी एखादी घटना समजत नाही
नाही कळली तरी फारसे बिघडत
नाही लाख वाटते, काही गोष्टी
विसराव्या पण.. असा आजवर अनुभव
की मी विसरत नाही समोर जे जे
येते, जातो सामोरा मी
छोट्याशाही अनुभवास मी चुकवत
नाही सुगंध, ताजेपणा खरे तर
चार क्षणांचा ख-या फुलांनी
म्हणून काही सजवत नाही जमेल
तेव्हा लहानग्यांना हसवत
बसतो हसणा-या
मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2565

कधी कधी : केदार पाटणकर

कधी कधी एखादी घटना समजत नाही
नाही कळली तरी फारसे बिघडत
नाही लाख वाटते, काही गोष्टी
विसराव्या पण.. असा आजवर अनुभव
की मी विसरत नाही समोर जे जे
येते, जातो सामोरा मी
छोट्याशाही अनुभवास मी चुकवत
नाही सुगंध, ताजेपणा खरे तर
चार क्षणांचा ख-या फुलांनी
म्हणून काही सजवत नाही जमेल
तेव्हा लहानग्यांना हसवत
बसतो हसणा-या
मोठ्यांच्यामध्ये बसवत नाही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, February 24, 2011

~ किती जीव घेणे ~ : Ramesh Thombre

~ किती जीव घेणे ~ तिचे मुग्ध
होणे किती जीव घेणे तिचे बोलणे
हे किती जीव घेणे तिला काय
झाले मला आकळेना तिला जाणणे हे
किती जीव घेणे मला टाळताना
तिला पाहतो मी तिचे पाहणे हे
किती जीव घेणे तिचे दूर जाणे
जिथे साहवेना तिचे पास* येणे
किती जीव घेणे तिची याद* येता
मला त्रास होतो तिला त्रास
होणे किती जीव घेणे तिचे नाव
ओठी रुळावे खिळावे तिने 'नाव
घेणे' किती जीव घेणे - रमेश
ठोंबरे (दि. २३ फेब्रु. २०११)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, February 23, 2011

तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे : मयुरेश साने

तुझ्याच साठी जगायला का !
मरायला ही तयार आहे !
तुझ्याविना या जगात माझा
जगावयाला नकार आहे उत्पत्ती
अन् स्थिती लयाचा - कलीयुगाचाच
खेळ सारा "अ" कार झाला - "उ" कार
झाला - महेश्वराचा "म" कार आहे
खुणावुनी सांगतो कसा बघ ! मला
नभातून शुक्र तारा कुणी नसे
सोबती तरी हा अढळ पणाचा विकार
आहे मनातुनी खोल साद येते - रडू
नको रे ! - रडू नको रे ! कुणीच
नाही इथे कुणाचा - तुझाच तू
शिल्पकार आहे तुला कधी सांग
वेळ होता ? टिपून घेण्यास गीत
माझे सुन्या सुन्या मैफलीत
माझ्या , मुकाच मी गीतकार आहे
गणीत कोणा कसे सुटावे ? उगाच
यावे - उगाच जावे ! पुन्हा
पुन्हा या जगी मराया तशी
शिदोरी चिकार आहे मयुरेश
साने..दि..२३-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कर प्रीये हॄदयाचे हाल पुन्हा एकदा : योगेश मेहरे

घाव तुझ्या नजरांनी घाल
पुन्हा एकदा कर प्रीये
हॄदयाचे हाल पुन्हा एकदा मनं
माझं आता; माझे ऐकू लागले
नयनांनी मोहिनी घाल पुन्हा
एकदा जीव घेणं माझा आवडतनां
तूला निघालो जगावया मार
पुन्हा एकदा 'मी तुझीच प्रिया'
बोलली तू कितीदा ओठांना हाय
तरी टाळ पुन्हा एकदा घट्ट मिठी
मारुनी 'जीवलगा' म्हणाया त्या
मंदिरात पडक्या चाल पुन्हा
एकदा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2556

अजुनी मनात ओले सहवास आज काही... : विशाल कुलकर्णी

हलकेच तू सख्या रे वदलास आज
काही कळले न ते इशारे, अदमास आज
काही... मनमोहना तुझी रे मुरली
मला पुकारे यमुनातिरी फुलावे
मधुमास आज काही... विसरायचे
सख्याला 'विसरून' आज गेले
अजुनी मनात ओले सहवास आज काही...
खुणवायचे मलाही करपाश ते
सुखांचे घडणार काय येथे रे खास
आज काही?... उरली अजून थोडी
जगण्यात आस वेडी उरले अजून
थोडे बस श्वास आज काही... विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

जखमेस ओल आली.... : निरज कुलकर्णी

जखमेस ओल आली.... एकांत रूक्ष
माझा, फेटाळतो जरा मी... गर्दीत
माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...
मज जिंकण्या मिळावा, का वाव ना
कधीही?? नुसत्या 'पराभवाला',
कंटाळतो जरा मी... डोळ्यांत
साठलेली, स्वप्नें तहानलेली...
निद्रेस टाळताना, ओशाळतो जरा
मी... चौफेर गोठलेला, अंधार
जीवघेणा... आयुष्य शोधताना,
ठेचाळतो जरा मी... मधुमुक्त
वागण्याचा, उलटून काळ गेला!
त्या रम्य आठवांना, कवटाळतो
जरा मी... तुज पाहूनी समोरी,
जखमेस ओल आली... स्वर्गीय
वेदनांना, सांभाळतो जरा मी...
आभार यातनेचे, मानून मी जराशे;
आभास हे तुझे मग, परिमाळतो जरा
मी... - निरज कुलकर्णी.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2561

जखमेस ओल आली.... : निरज कुलकर्णी

जखमेस ओल आली.... एकांत रूक्ष
माझा, फेटाळतो जरा मी... गर्दीत
माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...
मज जिंकण्या मिळावा, का वाव ना
कधीही?? नुसत्या 'पराभवाला',
कंटाळतो जरा मी... डोळ्यांत
साठलेली, स्वप्नें तहानलेली...
निद्रेस टाळताना, ओशाळतो जरा
मी... चौफेर गोठलेला, अंधार
जीवघेणा... आयुष्य शोधताना,
ठेचाळतो जरा मी... मधुमुक्त
वागण्याचा, उलटून काळ गेला!
त्या रम्य आठवांना, कवटाळतो
जरा मी... तुज पाहूनी समोरी,
जखमेस ओल आली... स्वर्गीय
वेदनांना, सांभाळतो जरा मी...
आभार यातनेचे, मानून मी जराशे;
आभास हे तुझे मग, परिमाळतो जरा
मी... - निरज कुलकर्णी.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

आरंभ... : निरज कुलकर्णी

आरंभ... हे सूर छेडताना, भलताच
त्रास झाला... माझ्या गळ्यास
माझा, आवाज फास झाला... स्मरूनी
तुला सख्या रे, मल्हार छेडला
मी... संचीत आठवांचा पाऊस खास
झाला... विरहातही तुझ्या या, मी
सार्वभौम होते... 'ती' एक वीज आली,
संपूर्ण र्‍हास झाला... मी
पोचता समेवर, गोठून काळ गेला...
आकांत मारव्याचा, आजन्म दास
झाला... मी भैरवीस जेव्हा,
माळावया निघाले... दुर्दम्य
वेदनेने, समृद्ध श्वास झाला...
मैफील संपल्याने झाली जरी
निराशा... अंतामुळेच माझा,
'आरंभ' ध्यास झाला... - निरज
कुलकर्णी.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

अर्थ मौनाचे... : निरज कुलकर्णी

अर्थ मौनाचे... लोक सारे व्यर्थ
जेव्हा, बडबडाया लागले... अर्थ
मौनाचे तुझ्या, मज आकळाया
लागले... तू अशी जादूगरी, केली
सखे माझ्यावरी... सावली अन् देह
आता, एक व्हाया लागले...
पौर्णिमेच्या चांदण्याने घाव
केले पाशवी... गूढ भय, अवसेतले,
मज आवडाया लागले... नम्रभावाने
जयांची, लाच मी अव्हेरली... ते
मनापासून मजला, घाबराया
लागले... ऐनवेळी घात केला, आप्त
गेले सोडुनी... हाय अन् छातीमधे,
भलते दुखाया लागले... - निरज
कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, February 22, 2011

अस्ता॑चली रवी : विकास सोहोनी

अस्ता॑चली रवी मी विझता॑ना
पहात होतो । पाऊल खुणा माझ्या
मिटता॑ना पहात होतो ॥१॥ तो गाज
सागराचा ऐटी ऽ त लाट होती ।
लाटेस किनार्‍यासी विरता॑ना
पहात होतो ॥२॥ मोहात मी
कितिकदा फसलो नि बुडलो होतो ।
लाटा॑त किनार्‍याला बुडता॑ना
पहात होतो ॥३॥ या अथा॑ग
सागराचा तो अल्पसा किनारा ।
मिलनाचे निकष सारे तुटता॑ना
पहात होतो ॥४॥ अमर्याद साठे
कोठे इतरा॑ना थे॑ब ही ना ।
व्याकुळ जीव जना॑चे जगता॑ना
पहात होतो ॥५॥ होडीत सागराची
आणून नित्य दौलत । कोणा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥६॥ जलदा॑परी मी व्हावे जीवन
जना॑स द्यावे । मी ढगा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥७॥
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2558

अस्ता॑चली रवी : विकास सोहोनी

अस्ता॑चली रवी मी विझता॑ना
पहात होतो । पाऊल खुणा माझ्या
मिटता॑ना पहात होतो ॥१॥ तो गाज
सागराचा ऐटी ऽ त लाट होती ।
लाटेस किनार्‍यासी विरता॑ना
पहात होतो ॥२॥ मोहात मी
कितिकदा फसलो नि बुडलो होतो ।
लाटा॑त किनार्‍याला बुडता॑ना
पहात होतो ॥३॥ या अथा॑ग
सागराचा तो अल्पसा किनारा ।
मिलनाचे निकष सारे तुटता॑ना
पहात होतो ॥४॥ अमर्याद साठे
कोठे इतरा॑ना थे॑ब ही ना ।
व्याकुळ जीव जना॑चे जगता॑ना
पहात होतो ॥५॥ होडीत सागराची
आणून नित्य दौलत । कोणा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥६॥ जलदा॑परी मी व्हावे जीवन
जना॑स द्यावे । मी ढगा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥७॥
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, February 21, 2011

कर प्रीये हॄदयाचे हाल पुन्हा एकदा : योगेश मेहरे

घाव तुझ्या नजरांनी घाल
पुन्हा एकदा कर प्रीये
हॄदयाचे हाल पुन्हा एकदा मनं
माझं आता; माझे ऐकू लागले
नयनांनी मोहिनी घाल पुन्हा
एकदा जीव घेणं माझा आवडतनां
तूला निघालो जगावया मार
पुन्हा एकदा 'मी तुझीच प्रिया'
बोलली तू कितीदा ओठांना हाय
तरी टाळ पुन्हा एकदा घट्ट मिठी
मारुनी 'जीवलगा' म्हणाया त्या
मंदिरात पडक्या चाल पुन्हा
एकदा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कर प्रीये हॄदयाचे हाल पुन्हा एकदा : योगेश मेहरे

घाव तुझ्या नजरांनी घाल
पुन्हा एकदा कर प्रीये
हॄदयाचे हाल पुन्हा एकदा मनं
माझं आता; माझे ऐकू लागले
नयनांनी मोहिनी घाल पुन्हा
एकदा जीव घेणं माझा आवडतनां
तूला निघालो जगावया मार
पुन्हा एकदा 'मी तुझीच प्रिया'
बोलली तू कितीदा ओठांना हाय
तरी टाळ पुन्हा एकदा घट्ट मिठी
मारुनी 'जीवलगा' म्हणाया त्या
मंदिरात पडक्या चाल पुन्हा
एकदा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कर ह्रुदयाचे हाल पुन्हा एकदा : योगेश मेहरे

नयनांनी मोहिनी घाल पुन्हा
एकदा कर प्रीये हॄदयाचे हाल
पुन्हा एकदा मनं माझं आता;
माझे ऐकू लागले नयनांनी
मोहिनी घाल पुन्हा एकदा जीव
जीव घेणं माझा आवडतनां तूला
निघालो जगावया मार पुन्हा
एकदा 'मी तुझीच प्रिया' बोलली
तू कितीदा ओठांना हाय तरी टाळ
पुन्हा एकदा घट्ट मिठी मारुनी
'जीवलगा' म्हणाया त्या मंदिरात
पडक्या चाल पुन्हा एकदा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

माळले गजरे तयांनी वाळलेले...! : विशाल कुलकर्णी

का ढगांनी बरसण्याचे
टाळलेले..? नाचरे हे मोर आम्ही
पाळलेले ... त्या फ़ुलांनी
सोडलेले बहरणेही... का
कळ्यांचे स्वप्न त्यांनी
जाळलेले...? मीच घेतो
प्राक्तनाचा ठाव माझ्या
नेहमी मजला सुखांनी गाळलेले ...
राग मी करतो सखीच्या
कुंतलांचा माळले गजरे तयांनी
वाळलेले...! चोर का त्यांनी
म्हणावे लोचनांना ? हे नयन
त्या चेहर्‍यावर भाळलेले... आज
'वेडे', शब्द थोडे आळवावे रे
विशाला काव्य तूही चाळलेले...
विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2553

प्रीती सखे मलाही का परवडू नये...? : विशाल कुलकर्णी

हसण्यात काय मोठे, का रे रडू
नये? वादात या कुणीही सहसा पडू
नये... जगण्यात अर्थ नाही
मृत्यो तुझ्याविना, सहवास
मात्र माझा तुज आवडू नये... आहे
तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू
नये...? उठती मनात नाना लहरी
नव्याजुन्या सवयी मनास आता
जहरी जडू नये.. नादान भावनांचे
गुंते पुरे सखे... घायाळ
काळजाला अन कुरतडू नये
स्वप्नात आज येती रुसवे तुझे
सखे प्रेमात हृदय माझे, का
धडधडू नये? विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2554

प्रीती सखे मलाही का परवडू नये...? : विशाल कुलकर्णी

हसण्यात काय मोठे, का रे रडू
नये? वादात या कुणीही सहसा पडू
नये... जगण्यात अर्थ नाही
मृत्यो तुझ्याविना, सहवास
मात्र माझा तुज आवडू नये... आहे
तुझाच वेडा, बदनाम जाहलो
प्रीती सखे मलाही का परवडू
नये...? उठती मनात नाना लहरी
नव्याजुन्या सवयी मनास आता
जहरी जडू नये.. नादान भावनांचे
गुंते पुरे सखे... घायाळ
काळजाला अन कुरतडू नये
स्वप्नात आज येती रुसवे तुझे
सखे प्रेमात हृदय माझे, का
धडधडू नये? विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

माळले गजरे तयांनी वाळलेले...! : विशाल कुलकर्णी

का ढगांनी बरसण्याचे
टाळलेले..? नाचरे हे मोर आम्ही
पाळलेले ... त्या फ़ुलांनी
सोडलेले बहरणेही... का
कळ्यांचे स्वप्न त्यांनी
जाळलेले...? मीच घेतो
प्राक्तनाचा ठाव माझ्या
नेहमी मजला सुखांनी गाळलेले ...
राग मी करतो सखीच्या
कुंतलांचा माळले गजरे तयांनी
वाळलेले...! चोर का त्यांनी
म्हणावे लोचनांना ? हे नयन
त्या चेहर्‍यावर भाळलेले... आज
'वेडे', शब्द थोडे आळवावे रे
विशाला काव्य तूही चाळलेले...
विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, February 20, 2011

वादात या कुणीही सहसा पडू नये : क्रान्ति

येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती
मला, पाऊल टाकले ते जागी अडू
नये! आनंदसोहळ्याला हे दार
वर्ज्य का? का नौबती सुखाच्या
येथे झडू नये? गालास तीट काळी,
आसू तसे हवे, वाहून जन्म जावा,
इतके रडू नये! त्याच्याविना
जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू
नये काट्यांत गुंतला ना,
निष्पाप, भाबडा? जीवास काय
ठावे, कोठे जडू नये? आजन्म
जीवनाचा मी शोध घेतला, हे
दैवजात होते, ते सापडू नये!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2552

वादात या कुणीही सहसा पडू नये : क्रान्ति

येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती
मला, पाऊल टाकले ते जागी अडू
नये! आनंदसोहळ्याला हे दार
वर्ज्य का? का नौबती सुखाच्या
येथे झडू नये? गालास तीट काळी,
आसू तसे हवे, वाहून जन्म जावा,
इतके रडू नये! त्याच्याविना
जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू
नये काट्यांत गुंतला ना,
निष्पाप, भाबडा? जीवास काय
ठावे, कोठे जडू नये? आजन्म
जीवनाचा मी शोध घेतला, हे
दैवजात होते, ते सापडू नये!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Saturday, February 19, 2011

''वादात या कुणीही सहसा पडू नये '' : कैलास

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
शेंदूर फासती का,आम्हास लोक
हे? हा प्रश्न दगड-धोंड्यांना
का पडू नये? उठसूठ मुख्यमंत्री
दिसतात मंदिरी का देव
अंतरी,त्यांना सापडू नये?
पाषाण तो जरी ही,पाहूनि अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू
नये? हसतात सातमजली, लाखोलि
वाहुनी ''कैलास''ने शिवीही,का
हासडू नये? --डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2551

''वादात या कुणीही सहसा पडू नये '' : कैलास

हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
शेंदूर फासती का,आम्हास लोक
हे? हा प्रश्न दगड-धोंड्यांना
का पडू नये? उठसूठ मुख्यमंत्री
दिसतात मंदिरी का देव
अंतरी,त्यांना सापडू नये?
पाषाण तो जरी ही,पाहूनि अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू
नये? हसतात सातमजली, लाखोलि
वाहुनी ''कैलास''ने शिवीही,का
हासडू नये? --डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचूनही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2550

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचूनही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2550

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचूनही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2550

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचूनही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2550

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचून ही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2550

भेट ही घेऊ नको : शोभातेलन्ग

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ
नको मी कघी येणार नाही वाट तू
पाहू नको एकटा माणूस आला .एकटा
जाणारही माहिती आहे तुला तू
सोबती होऊ नको शांत मी माझ्या
घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही
येऊ नको आपला मोठेपणा
सांगावया लोकांपुढे तेचते
बाजार बसवे शब्द तू चिवडू नको "
धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही
या जगी " या विचारांनी पुन्हा
बाजी कुठे मारू नको एकटी चालेल
"शोभा " सोबती वाचून ही तू तुझा
संदेश किंवा सारथी धाडू नको
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, February 18, 2011

तुझा दोष नाही !! : supriya.jadhav7

तुझा दोष नाही !! जरी कुंकवाचीच
अंतीम कक्षा, तुझा दोष नाही !
गळा पोत काळी रुळे... हीच
शिक्षा, तुझा दोष नाही !! कुणी
बोट दावी, कुणी बोलुनी होय
नामानिराळा, (तुझ्या
पावित्र्याचीच अग्नीपरिक्षा,
तुझा दोष नाही !!) कुठे
बाळ-श्रावण? कधी सर्प जागे
पिलेल्या दुधाला? तुझ्या
पाझराचा सदा भार वक्षा, तुझा
दोष नाही !! क्षणी पाठ दावी तुला
पाठचाही, कुणी ना कुणाचा... ,
तुझी ना करे "दोर कच्चाच"
रक्षा, तुझा दोष नाही !! भल्या
कोण वाली ? इथे दुर्गुणांची
घडे नित्य अर्चा, तुझ्या
सदगुणांचीच परखड समिक्षा,
तुझा दोष नाही !! -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2549

तुझा दोष नाही !! : supriya.jadhav7

तुझा दोष नाही !! जरी कुंकवाचीच
अंतीम कक्षा, तुझा दोष नाही !
गळा पोत काळी रुळे... हीच
शिक्षा, तुझा दोष नाही !! कुणी
बोट दावी, कुणी बोलुनी होय
नामानिराळा, (तुझ्या
पावित्र्याचीच अग्नीपरिक्षा,
तुझा दोष नाही !!) कुठे
बाळ-श्रावण? कधी सर्प जागे
पिलेल्या दुधाला? तुझ्या
पाझराचा सदा भार वक्षा, तुझा
दोष नाही !! क्षणी पाठ दावी तुला
पाठचाही, कुणी ना कुणाचा... ,
तुझी ना करे "दोर कच्चाच"
रक्षा, तुझा दोष नाही !! भल्या
कोण वाली ? इथे दुर्गुणांची
घडे नित्य अर्चा, तुझ्या
सदगुणांचीच परखड समिक्षा,
तुझा दोष नाही !! -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

ती बातमीच दाटली घशाशी : अनिल रत्नाकर

ती बातमीच दाटली घशाशी गर्दीच
कोण साठली घराशी! नाही मला अता
जगावयाचे भांडेच आज सावली
जगाशी का ढवळता निवांत त्या
तवंगा ईच्छा तळात नाचली मघाशी
गेले गळून आप्त पान कसे? फांदी
मनात हालली जराशी जे बोललो
मलाच लागले ते ती जीभ मीच
चावली अधाशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला.... : मयुरेश साने

श्वास माझे सांगती मी पाहिजे
थांबायला थांबणे सोसेल तोवर
लागते चालायला पाहिले होते
तुला आलीस मग स्वप्नात तू
स्वप्नपुर्ती ध्येय झाले
लागले जागायला घेतले जेव्हा
कडेवर "पांगळे" से दुखः मी ते
पहा ना ! सूख माझे लागले
रांगायला लागला मतितार्थ
गीतेचा मला "तो" - हा - असा भोग
सारे भोगतो मी ! "या जगातच"
यायला आरसा पाहून घे ! तू -
पत्रिका पाहू नको शेवटी होतेच
"ते" - वाटे - नको ! "जे" व्हायला
कायद्याची थोरवी कोणीच नाही
गायली कायद्याच्या आडवाटा
लागल्या सांगायला मयुरेश
साने...दि..१८-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

सुखाने असावी तू ! : योगेश मेहरे

सुखाने असावी तुझिया घरी तू
मनाची ग माझ्या खुनी रे जरी तू
तुला ठाव होते तुझे नाव गाव
कशी चुकली वाट माझ्या परी तू
सखे या प्रीतीचा अर्थ हा असाहे
क्रिष्ण मी तुझा, नाही राधा
जरी तू कुणा काय सान्गू किती
भिक मान्गू असा मी भिकारी, बरी
तू बरी तू तप्त या उन्हाने ग
पोळून गेलो कशी काय आहे
म्रुगाचे सरी तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Thursday, February 17, 2011

वादात या कुणीही सहसा पडू नये ! : मयुरेश साने

माझ्याच आरशाला "मी" आवडू नये ?
वादात या कुणीही सहसा पडू नये !
हासून हुंदक्यांना मी टाळले
जरी काहूर आसवांचे दडता दडू
नये ? जेव्हा फुला प्रमाणे -
स्पर्शेन मी तुला ! काटा बनून
कोणी तेव्हा नडू नये ! येऊ नकाच
कोणी - मागायला मते ! दारात
दु:खीतांच्या कोणी रडू नये !
आश्वासुनी "उद्याला" जे श्वास
घोटती ! (त्यांचे कुठे कधीही
काही अडू नये ?) मयुरेश
साने..दि..१७-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2545

वादात या कुणीही सहसा पडू नये ! : मयुरेश साने

माझ्याच आरशाला "मी" आवडू नये ?
वादात या कुणीही सहसा पडू नये !
हासून हुंदक्यांना मी टाळले
जरी काहूर आसवांचे दडता दडू
नये ? जेव्हा फुला प्रमाणे -
स्पर्शेन मी तुला ! काटा बनून
कोणी तेव्हा नडू नये ! येऊ नकाच
कोणी - मागायला मते ! दारात
दु:खीतांच्या कोणी रडू नये !
आश्वासुनी "उद्याला" जे श्वास
घोटती ! (त्यांचे कुठे कधीही
काही अडू नये ?) मयुरेश
साने..दि..१७-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Wednesday, February 16, 2011

जरी वाटेल माझे बोलणे : अजय अनंत जोशी

जरी वाटेल माझे बोलणे खोटे
तुला हृदय माझे कधी नव्हते
दिले उसने तुला मनाशी रोजची
हितगूज होती चालली तुझ्याशी
बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते
हसे जगालाही मजा येते जशी येते
तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो
वागणे तसे आकाश त्या बदल्यात
बोलवते तुला ? महागाई किती
प्रेमातही बघ वाढली तरी
स्वस्तात माझा भरवसा आहे तुला
मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते
तुला मला सर्वांपुढे तू टाळते
आहेस पण... मला माहीत आहे कोण
आवडते तुला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2542

कोणता जन्म इथे सांग??? : मयुरेश साने

कोणता जन्म इथे सांग -
हासण्यासाठी ? घेतले श्वास "मी"
- जिवंत - भासण्यासाठी ! ओळखीचेच
कुणी आज मला भेटावे ओळखीचाच
मिळो फास - संपण्यासाठी ! रे !
वसंता मला नकोत फुलांच्या
हाका चाललो मी इथे - मुळी न
थांबण्यासाठी माळ माझेच
ह्रुदय - मोकळ्या केसांमधुनी
जीव उरला कुठे तुझ्यात
गुंतण्यासाठी ! कोणता शब्द
तुला देऊ सखे सांग मला ? दोन
डोळे दिलेत प्रेम
उमजण्यासाठी व्रण झालेत जुने
वेदना तरीही नवी अश्रु येती
अजून प्रेम सांडण्यासाठी
मयुरेश साने..दि...१६-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

जरी वाटेल माझे बोलणे : अजय अनंत जोशी

जरी वाटेल माझे बोलणे खोटे
तुला हृदय माझे कधी नव्हते
दिले उसने तुला मनाशी रोजची
हितगूज होती चालली तुझ्याशी
बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते
हसे जगालाही मजा येते जशी येते
तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो
वागणे तसे आकाश त्या बदल्यात
बोलवते तुला ? महागाई किती
प्रेमातही बघ वाढली तरी
स्वस्तात माझा भरवसा आहे तुला
मला तू सोडले आहेस याची खंत
नाही दिले आहे जगाशी बांधुनी
नाते तुला मला सर्वांपुढे तू
टाळते आहेस पण... मला माहीत आहे
कोण आवडते तुला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2542

जरी वाटेल माझे बोलणे ... : अजय अनंत जोशी

जरी वाटेल माझे बोलणे खोटे
तुला हृदय माझे कधी नव्हते
दिले उसने तुला मनाशी रोजची
हितगूज होती चालली तुझ्याशी
बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते
हसे जगालाही मजा येते जशी येते
तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो
वागणे तसे आकाश त्या बदल्यात
बोलवते तुला ? महागाई किती
प्रेमातही बघ वाढली तरी
स्वस्तात माझा भरवसा आहे तुला
मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते
तुला मला सर्वांपुढे तू टाळते
आहेस; पण... मला माहीत आहे कोण
आवडते तुला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

जरी वाटेल माझे बोलणे : अजय अनंत जोशी

जरी वाटेल माझे बोलणे खोटे
तुला हृदय माझे कधी नव्हते
दिले उसने तुला मनाशी रोजची
हितगूज होती चालली तुझ्याशी
बोललो मी वाटले होते तुला
जगाशी भांडल्याने आपले होते
हसे जगालाही मजा येते जशी येते
तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो
वागणे तसे आकाश त्या बदल्यात
बोलवते तुला ? महागाई किती
प्रेमातही बघ वाढली तरी
स्वस्तात माझा भरवसा आहे तुला
मला तू सोडले आहेस याची खंत
नाही दिले आहे जगाशी बांधुनी
नाते तुला मला सर्वांपुढे तू
टाळते आहेस पण... मला माहीत आहे
कोण आवडते तुला
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Monday, February 14, 2011

चाहुलीची तुझ्या चमक... : वैभव देशमुख

चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची ओठ
रक्ताळले लाल झाला गळा काय
इतकी गरज कडक बोलायची बोल
केव्हातरी मुक्त वार्‍यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची जे
तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची
खूण साधी पुरे शाहण्याला कळे
काय आहे गरज ठळक बोलायची - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2541

चाहुलीची तुझ्या चमक... : वैभव देशमुख

चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची वाह
रे वाह ही पाहण्याची तर्‍हा
हाय रे हाय ही लकब बोलायची ओठ
रक्ताळले लाल झाला गळा काय
इतकी गरज कडक बोलायची बोल
केव्हातरी मुक्त वार्‍यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची जे
तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची
खूण साधी पुरे शाहण्याला कळे
काय आहे गरज ठळक बोलायची - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Saturday, February 12, 2011

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे : मी अभिजीत

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
काळोख जो जगाचा, माझी प्रभात
आहे आताच मैफलीचा मी वर्ज्य
सूर झालो माझ्याशिवाय गाणे
तालासुरात आहे गेलो निघून
डोळे ठेवून कोरडे मी माझ्याच
आसवांचे पाणी घनात आहे
गोंजारतो अताशा माझ्याच
वेदना मी सांगा तरी नशा ही
दुसर्‍या कशात आहे खेळात या
नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात
आहे -- मी अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2539

बोलू नकोस काही : मयुरेश साने

बोलू नकोस काही - समजून घे
इशारे ! ये ना मिठीत माझ्या ! दे
अंगावरी शहारे ! रेंगाळते
कशाला ? ये ना ! निघून आता !
विझवून जा उरीचे - ते श्वास
पेटणारे ! अत्ता मला समजले का ?
फुलती कळ्या खुळ्या ! भेटीस
सज्ज अपुल्या झाले गुलाब सारे
! चंद्रा तुला आता मी - दावेन
पौर्णिमा ! म्हणशील "कोजागिरी"
ला - "पेटते निखारे" ! आल्या नटून
रात्री - बेधुंद गार वारा !
डोळ्यास पापणीचे - बघ जागते
पहारे ! .............. मयुरेश साने
...दि.१२-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2540

बोलू नकोस काही : मयुरेश साने

बोलू नकोस काही - समजून घे
इशारे ! ये ना मिठीत माझ्या ! दे
अंगावरी शहारे ! रेंगाळते
कशाला ? ये ना ! निघून आता !
विझवून जा उरीचे - ते श्वास
पेटणारे ! अत्ता मला समजले का ?
फुलती कळ्या खुळ्या ! भेटीस
सज्ज अपुल्या झाले गुलाब सारे
! चंद्रा तुला आता मी - दावेन
पौर्णिमा ! म्हणशील "कोजागिरी"
ला - "पेटते निखारे" ! आल्या नटून
रात्री - बेधुंद गार वारा !
डोळ्यास पापणीचे - बघ जागते
पहारे ! .............. मयुरेश साने
...दि.१२-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Friday, February 11, 2011

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे : मी अभिजीत

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
काळोख जो जगाचा, माझी प्रभात
आहे आताच मैफलीचा मी वर्ज्य
सूर झालो माझ्याशिवाय गाणे
तालासुरात आहे गेलो निघून
डोळे ठेवून कोरडे मी माझ्याच
आसवांचे पाणी घनात आहे
गोंजारतो अताशा माझ्याच
वेदना मी सांगा तरी नशा ही
दुसर्‍या कशात आहे खेळात या
नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात
आहे -- मी अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

जाळे पुढयात माझ्या .... : विदेश

जाळे पुढयात माझ्या पसरून कोण
गेली, जाळ्यामधील मासा विसरून
कोण गेली ! एका स्मितातुनीही
घायाळ मज समजता- उपचार पूर्ण
करण्या विसरून कोण गेली !
काहूर स्पंदनांचे ह्रदयात
माजवूनी, हृदयासनात बसण्या
विसरून कोण गेली ! नयनात
भाव-सुमने हलकेपणी उमलता-
टिपण्यास या मधुकणां विसरून
कोण गेली ! घेऊन मीलनाच्या
चंद्रासमोर शपथा, बाहूत मज
बिलगण्या विसरून कोण गेली ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2309

जाळे पुढयात माझ्या .... : विदेश

जाळे पुढयात माझ्या पसरून कोण
गेली, जाळ्यामधील मासा विसरून
कोण गेली ! एका स्मितातुनीही
घायाळ मज समजता- उपचार पूर्ण
करण्या विसरून कोण गेली !
काहूर स्पंदनांचे ह्रदयात
माजवूनी, हृदयासनात बसण्या
विसरून कोण गेली ! नयनात
भाव-सुमने हलकेपणी उमलता-
टिपण्यास या मधुकणां विसरून
कोण गेली ! घेऊन मीलनाच्या
चंद्रासमोर शपथा, बाहूत मज
बिलगण्या विसरून कोण गेली ?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2309

शिखर त्यांनी गाठलेले - : विदेश

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा
धुंडाळतो चालती तो-यात सारे
मीच का ठेचाळतो |१| देव
दगडांतील येथे पुजुन का
कंटाळतो माणसांतिल देव तेथे
पूजणे ना टाळतो |२| शोभती जरि आज
कपडे भरजरी अंगावरी कालच्या
सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो
|३| फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू
झाकतो अब्रु उघड्यावर थिरकते
मंच ना ओशाळतो |४| चोर अपराधीच
येथे उजळ माथे मिरवती वेदना
इतरां न होते तीच का कवटाळतो |५|
बीज ते साधेपणाचे काल कोणी
पेरले रोप भाऊबंदकीचे आजला
सांभाळतो |६|
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2459

Thursday, February 10, 2011

तुझा दोष नाही : मी अभिजीत

तुझा दोष नाही, तुझी चूक नाही
जळाने शमावी अशी भूक नाही कसे
धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही
लिलावी स्वतःलाच मांडेन
म्हणतो मला मोल माझेच ठाऊक
नाही जरा पाहता रोखुनी, ती
म्हणाली गझल तू करावीस; चेटूक
नाही कशाला कहाणी जगा ऐकवू मी
कुणी एवढा येथ भावूक नाही जरी
मानतो चौकटी काफ़ियांच्या
गझलकार हा कूपमंडूक नाही -- मी
अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2538

तुझा दोष नाही : मी अभिजीत

तुझा दोष नाही, तुझी चूक नाही
जळाने शमावी अशी भूक नाही कसे
धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही
लिलावी स्वतःलाच मांडेन
म्हणतो मला मोल माझेच ठाऊक
नाही जरा पाहता रोखुनी, ती
म्हणाली गझल तू करावीस; चेटूक
नाही कशाला कहाणी जगा ऐकवू मी
कुणी एवढा येथ भावूक नाही जरी
मानतो चौकटी काफ़ियांच्या
गझलकार हा कूपमंडूक नाही -- मी
अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

आल्या सजून राती.... : supriya.jadhav7

आल्या सजून राती.... स्पर्शात
चांदण्यांच्या आल्या सजून
राती ! देहातले दुरावे गेल्या
त्यजून राती !! हातात हात
घेता,एकांत कंप पावे, आधार तव
मिठीचा घेती धजून राती !!
कल्लोळ भावनांचे ओठांवरी
उमटता, गंधाळल्या क्षणांच्या
साक्षी अजून राती !! व्याकूळते
अजूनी अंगांग समर्पणासी,
माळून श्वास ताजे नटल्यात जून
राती !! स्वर्गातल्या सुखांची
ना वानवा उरावी, मन्मंदिरी
प्रियेला गेल्या भजून राती !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2536

विमान माझे तयार होते ! : मयुरेश साने

खरेच का ? चांदणे तुझे- ते -मला
कधी भेटणार होते ! हजार वणवे
उरात माझ्या - चितेवरी पेटणार
होते ! "समाज भिंती " सपाट करुनी -
जरा तुझ्या अंगणात आलो ! नव्या
नव्या तोरणात नटले - मला तुझे -
बंद दार होते ! तुला दिली "ती" !
फुलेच नव्हती - "ऋतु - ऋतुंचे
सवाल" होते ! अनेकदा "मोहरुन"
गेलो - हवे हवेसे - नकार होते !
हसून देईन कारणे - का ? रडावयाला
उशीर झाला ! "सऋद्य" जे वाटले
तयांचे - जिवंत ठोकेच ठार होते !
* ( "सऋद्य" - सर्‍हुदयी -
संवेदनशील- भावनाप्रधान )
जिवंत होतो -जगून गेलो -
मरावयाला जिवंत आहे ! विसंबुनी
राहिलो कसा ? मी - तिने दिले
"शब्द चार" होते ! सुळावरी दे
मला ! तरीही इमान माझे प्रमाण
आहे "तुका" ! "विठोबा" उभे कधीचे -
विमान माझे तयार होते !
.............मयुरेश साने....दि...९-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2535

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा... : सोनाली जोशी

नवीन रस्ते बघून बसली ,कोठे
दडून स्वप्ने उगाच आशा
नव्यानव्याची, होती धरून
स्वप्ने... कधी कुठे झगमगाट
दिसला, केला कुणी इशारा... तुझीच
फसली कशी कळेना ,डोळे दिपून
स्वप्ने कसा कसा वाढला कळू दे
,माझा तुझा दुरावा... म्हणे
कुशीवर निजून होती, तेव्हा
वळून स्वप्ने तुला कधीही जरा न
कळले, शब्दास मान देणे किती
जिवाची भिरभिर झाली, गेली उडून
स्वप्ने अजूनही या मनात आहे,
आशा टिकून वेडी हळूच तू मंतरून
गेला ,माझी दुरून स्वप्ने तुझी
खुशाली बनून येते जेव्हा
झुळूक आता मनात माझ्या दरवळती
ही तेव्हा फुलून स्वप्ने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2534

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा... : सोनाली जोशी

नवीन रस्ते बघून बसली ,कोठे
दडून स्वप्ने उगाच आशा
नव्यानव्याची, होती धरून
स्वप्ने... कधी कुठे झगमगाट
दिसला, केला कुणी इशारा... तुझीच
फसली कशी कळेना ,डोळे दिपून
स्वप्ने कसा कसा वाढला कळू दे
,माझा तुझा दुरावा... म्हणे
कुशीवर निजून होती, तेव्हा
वळून स्वप्ने तुला कधीही जरा न
कळले, शब्दास मान देणे किती
जिवाची भिरभिर झाली, गेली उडून
स्वप्ने अजूनही या मनात आहे,
आशा टिकून वेडी हळूच तू मंतरून
गेला ,माझी दुरून स्वप्ने तुझी
खुशाली बनून येते जेव्हा
झुळूक आता मनात माझ्या दरवळती
ही तेव्हा फुलून स्वप्ने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2534

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला... : विशाल कुलकर्णी

चालण्याचे दु:ख जोवर लागते
विसरायला थांबणे सोसेल तोवर
लागते चालायला... लाघवी
भासांसवे संवेदना सुखवायला
वास्तवाचे पाश ते मग लागती
जाचायला... लाजणार्‍या
मोगर्‍याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे
समजायला... मी फुलांना सांगतो
हे भुलवणे आता नको त्या
कळ्यांचा धीर आता लागला
संपायला... या जगाची रीत न्यारी
शिकवते भोगायला लागते मग सवय
वेड्या.., वेदनांची व्हायला...
नमस्कार मंडळी, गझलेच्या
क्षेत्रात मी अगदीच नवखा आहे.
मायबोलीवरच्या काही
गुरूजनांकडून नुकतेच शिकायला
सुरुवात केलीय. इथेही बरेच
काही शिकता येइल अशी अपेक्षा
मनात बाळगुन आलोय. आपल्या
मार्गदर्शनाच्या
प्रतीक्षेत.... विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2537

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला... : विशाल कुलकर्णी

चालण्याचे दु:ख जोवर लागते
विसरायला थांबणे सोसेल तोवर
लागते चालायला... लाघवी
भासांसवे संवेदना सुखवायला
वास्तवाचे पाश ते मग लागती
जाचायला... लाजणार्‍या
मोगर्‍याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे
समजायला... मी फुलांना सांगतो
हे भुलवणे आता नको त्या
कळ्यांचा धीर आता लागला
संपायला... या जगाची रीत न्यारी
शिकवते भोगायला लागते मग सवय
वेड्या.., वेदनांची व्हायला...
नमस्कार मंडळी, गझलेच्या
क्षेत्रात मी अगदीच नवखा आहे.
मायबोलीवरच्या काही
गुरूजनांकडून नुकतेच शिकायला
सुरुवात केलीय. इथेही बरेच
काही शिकता येइल अशी अपेक्षा
मनात बाळगुन आलोय. आपल्या
मार्गदर्शनाच्या
प्रतीक्षेत.... विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

आल्या सजून राती.... : supriya.jadhav7

आल्या सजून राती.... स्पर्शात
चांदण्यांच्या आल्या सजून
राती ! देहातले दुरावे गेल्या
त्यजून राती !! हातात हात
घेता,एकांत कंप पावे, आधार तव
मिठीचा घेती धजून राती !!
कल्लोळ भावनांचे ओठांवरी
उमटता, गंधाळल्या क्षणांच्या
साक्षी अजून राती !! व्याकूळते
अजूनी अंगांग समर्पणासी,
माळून श्वास ताजे नटल्यात जून
राती !! स्वर्गातल्या सुखांची
ना वानवा उरावी, मन्मंदिरी
प्रियेला गेल्या भजून राती !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Wednesday, February 9, 2011

विमान माझे तयार होते ! : मयुरेश साने

खरेच का ? चांदणे तुझे- ते -मला
कधी भेटणार होते ! हजार वणवे
उरात माझ्या - चितेवरी पेटणार
होते ! "समाज भिंती " सपाट करुनी -
जरा तुझ्या अंगणात आलो ! नव्या
नव्या तोरणात नटले - मला तुझे -
बंद दार होते ! तुला दिली "ती" !
फुलेच नव्हती - "ऋतु - ऋतुंचे
सवाल" होते ! अनेकदा "मोहरुन"
गेलो - हवे हवेसे - नकार होते !
हसून देईन कारणे - का ? रडावयाला
उशीर झाला ! "सऋद्य" जे वाटले
तयांचे - जिवंत ठोकेच ठार होते !
* ( "सऋद्य" - सर्‍हुदयी -
संवेदनशील- भावनाप्रधान )
जिवंत होतो -जगून गेलो -
मरावयाला जिवंत आहे ! विसंबुनी
राहिलो कसा ? मी - तिने दिले
"शब्द चार" होते ! सुळावरी दे
मला ! तरीही इमान माझे प्रमाण
आहे "तुका" ! "विठोबा" उभे कधीचे -
विमान माझे तयार होते !
.............मयुरेश साने....दि...९-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कसा कसा वाढला कळू दे ,माझा तुझा दुरावा... : सोनाली जोशी

नवीन रस्ते बघून बसली ,कोठे
दडून स्वप्ने उगाच आशा
नव्यानव्याची, होती धरून
स्वप्ने... कधी कुठे झगमगाट
दिसला, केला कुणी इशारा... तुझीच
फसली कशी कळेना ,डोळे दिपून
स्वप्ने कसा कसा वाढला कळू दे
,माझा तुझा दुरावा... म्हणे
कुशीवर निजून होती, तेव्हा
वळून स्वप्ने तुला कधीही जरा न
कळले, शब्दास मान देणे किती
जिवाची भिरभिर झाली, गेली उडून
स्वप्ने अजूनही या मनात आहे,
आशा टिकून वेडी हळूच तू मंतरून
गेला ,माझी दुरून स्वप्ने तुझी
खुशाली बनून येते जेव्हा
झुळूक आता मनात माझ्या दरवळती
ही तेव्हा फुलून स्वप्ने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Tuesday, February 8, 2011

डोळ्यात अडकली स्वप्ने.. : बहर

डोळ्यात अडकली स्वप्ने..
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच
विराणी.. हळवासा स्पर्श तुझा
तो .. आठवतो आज तनूला.. अलवार बोल
अजुनीही.. मांडती तुझी
गाऱ्हाणी! तू गेल्यावर
जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने
ही अनवाणी! बागेतच फुलतो आता..
बाजार फुलांचा मोठा.. हा उदिम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! ही पुरे वर्णने आता,
ओघळणाऱ्या घावांची.. का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2529

गिधाडॅ : गणेश लाड

*||गिधाडे||* भोवति गिधाडांचाच
घोळका सारा होता श्वासांवर
माझ्या जागता पहारा होता ||
सोसून आयुष्य अवघे, पोसून
जगविले त्यांना माझे
रक्तमांस हाच तर त्यांचा चारा
होता || चांगुलपणा होता की ,
केला नादान मुर्खपणा गरळ
ओकणारा, अस्तनीत निखारा होता.||
धूर्त नात्यांच्या मायेचा
मायावी बाजार हा मोडकी माझी
तिरडी, पांगळा सहारा होता. ||
संधीसाठी नेहमीच टपून होती ही
गिधाडे अंतयात्रेतही
त्यांचीच गर्दी , काय तो नजारा
होता.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

वेढुनी आवेग माझा रोज गाभुळतेस तू : बेफिकीर

वेढुनी आवेग माझा रोज
गाभुळतेस तू पण तुला ओलावतो
तेव्हा मनी नसतेस तू मी मला का
आवडावे ही समस्या संपली की
तुला सांगेन मी की खूप आवडतेस
तू शोधतो माझ्या खुणा विझत्या
निखार्‍यातून मी जाळुनी
हासून निमिषार्धात ओसरतेस तू
दर्शनासाठी असभ्यासारखा
खोळंबतो आणि सभ्यासारखी
पडद्यातुनी बघतेस तू चांगले
काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली
दिसतेस तू मीलनाची रात सारी
कोरडी जाऊनही नीट वागवतेस
दिवसा, हे कसे करतेस तू? तू तसे
केलेस की मी नाकही घासायचे मी
अबोला पाळला की 'बेफिकिर'
म्हणतेस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2532

वेढुनी आवेग माझा रोज गाभुळतेस तू : बेफिकीर

वेढुनी आवेग माझा रोज
गाभुळतेस तू पण तुला ओलावतो
तेव्हा मनी नसतेस तू मी मला का
आवडावे ही समस्या संपली की
तुला सांगेन मी की खूप आवडतेस
तू शोधतो माझ्या खुणा विझत्या
निखार्‍यातून मी जाळुनी
हासून निमिषार्धात ओसरतेस तू
दर्शनासाठी असभ्यासारखा
खोळंबतो आणि सभ्यासारखी
पडद्यातुनी बघतेस तू चांगले
काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली
दिसतेस तू मीलनाची रात सारी
कोरडी जाऊनही नीट वागवतेस
दिवसा, हे कसे करतेस तू? तू तसे
केलेस की मी नाकही घासायचे मी
अबोला पाळला की 'बेफिकिर'
म्हणतेस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Monday, February 7, 2011

केव्हा तू जादू केली अन ही मंतरली स्वप्ने : सोनाली जोशी

बघून अनोळखी रस्त्यांना का
बावरली स्वप्ने आकळेना आता
कुठे ती दडून बसली स्वप्ने
होता झगमगाट रस्त्यावर
,देखावा गाड्यांचा डोळे दिपले
आणि जाळ्यात होती शिरली
स्वप्ने किंमत शब्दांची
माझ्या ना कळली तुला कधीही जीव
कसा माझा भिरभिरला ,किती
विखुरली स्वप्ने अजूनही या
मनात टिकून आहे वेडी आशा
केव्हा तू जादू केली अन ही
मंतरली स्वप्ने झुळुकेसवे
येईल इकडे सखया तुझी खुशाली
माळून ती श्वासात माझ्या पहा
हासली स्वप्ने चंद्राप्रमाणे
तू आहेस देखणा कळले मला ... त्या
गुलाबी रात्री लाजली अन
मोहरली स्वप्ने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

Sunday, February 6, 2011

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला : कैलास गांधी

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत
नाही मला सोबती असतो सतत नी
धीर देतो सारखा पण चुका घडण्या
अगोदर थांबवत नाही मला एक दहशत
नांदते आहे पुन्हा गावामधे जी
घराबाहेर हल्ली पाठवत नाही
मला कोणता हा काळ पाठी घेवूनी
मी चाललो पेलवत नाही मला पण
सोडवत नाही मला हा नव्हे विवेक
माझा हि खरी असहायता धुमसते जी
आत केवळ पेटवत नाही मला उंच
टॉवर बांधण्यासाठी नसावे
सोयीचे याचसाठी तो घरातून
हुसकवत नाही मला बेगडी चेहराच
माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही
मला ढळतो मी अश्रू केवळ
जमाखर्च पाहुनी आसवांची गळती
रोजच परवडत नाही मला लाख तू
समजूत माझी घालण्याची शर्थ कर
लाघवी शब्दात हुकुमत जाणवत
नाही मला वाकलो देवासामोरी हा
खरेतर दृष्टीभ्रम वेदनांचे
बोचके बघ पेलवत नाही मला (मेरा
बदन बोझ से दुहरा हुवा होगा.....
मई सजदे में नहीं था आपको धोका
हुवा होगा.. ......दुष्यंतकुमार )
....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2521

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला : कैलास गांधी

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत
नाही मला सोबती असतो सतत नी
धीर देतो सारखा पण चुका घडण्या
अगोदर थांबवत नाही मला एक दहशत
नांदते आहे पुन्हा गावामधे जी
घराबाहेर हल्ली पाठवत नाही
मला कोणता हा काळ पाठी घेवूनी
मी चाललो पेलवत नाही मला पण
सोडवत नाही मला हा नव्हे विवेक
माझा हि खरी असहायता धुमसते जी
आत केवळ पेटवत नाही मला उंच
टॉवर बांधण्यासाठी नसावे
सोयीचे याचसाठी तो घरातून
हुसकवत नाही मला बेगडी चेहराच
माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही
मला ढळतो मी अश्रू केवळ
जमाखर्च पाहुनी आसवांची गळती
रोजच परवडत नाही मला लाख तू
समजूत माझी घालण्याची शर्थ कर
लाघवी शब्दात हुकुमत जाणवत
नाही मला वाकलो देवासामोरी हा
खरेतर दृष्टीभ्रम वेदनांचे
बोचके बघ पेलवत नाही मला (मेरा
बदन बोझ से दुहरा हुवा होगा.....
मई सजदे में नहीं था आपको धोका
हुवा होगा.. ......दुष्यंतकुमार )
....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2521

राजसा. : कमलाकर देसले

चेहरा मी तुझा वाचला राजसा
प्रेम आहे तुझी रे कला राजसा..
पुस्तकासारखे वाचले तू मला
चाळताना मला;भाळला राजसा..
चंद्रही तो नको.त्या नको तारका
स्वर्ग द्यावास बाहूतला
राजसा.. झोपडी छान ही
राजवाड्याहुनी शीव भोळा जणू
लाभला राजसा.. मेघधारा जणू रे
तुझा स्पर्श हा मोर माझ्या मनी
नाचला राजसा... ऊन
माथ्यावरी.तापला तू जरी गारवा
हा तळी घातला राजसा..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2525

Saturday, February 5, 2011

तुझा दोष नाही !!! : supriya.jadhav7

तुझा दोष नाही !!! तुझ्यासारखे
बघ, मलाही सुखाने जगाया न आले,
तुझा दोष नाही ! तुझी होत होता,
कधीही सख्या मग कुणाची न झाले,
तुझा दोष नाही !! पहाटे पहाटे
धुके दाटलेल्या सराईत
वाटेवरी चालताना.... उरी
ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी
जळाले, तुझा दोष नाही !! सुखा
गोंजराया दहाही दिशांनी
लवूनी हजेरी इथे लावलेली,
खड्या संकटांनी, सगे-सोयरेही
निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!
वसंतातल्या कोकिळेची मलाही,
कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी
क्षणांच्या ऋतूंनी नहाले,
तुझा दोष नाही !! तुझ्या मागुती
चालले रे मुक्याने, नि म्हणशील
त्याला मी 'मम' म्हणाले, तुझे
वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना
कळाले तुझा दोष नाही !! -
सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2530

तुझा दोष नाही !!! : supriya.jadhav7

तुझा दोष नाही !!! तुझ्यासारखे
बघ, मलाही सुखाने जगाया न आले,
तुझा दोष नाही ! तुझी होत होता,
कधीही सख्या मग कुणाची न झाले,
तुझा दोष नाही !! पहाटे पहाटे
धुके दाटलेल्या सराईत
वाटेवरी चालताना.... उरी
ठेचकाळून, त्या वेदनेने उभीशी
जळाले, तुझा दोष नाही !! सुखा
गोंजराया दहाही दिशांनी
लवूनी हजेरी इथे लावलेली,
खड्या संकटांनी, सगे-सोयरेही
निमीषी पळाले, तुझा दोष नाही !!
वसंतातल्या कोकिळेची मलाही,
कितीदातरी साद घालून झाली,
तुझ्या आठवांच्या, सुगंधी
क्षणांच्या ऋतूंनी नहाले,
तुझा दोष नाही !! तुझ्या मागुती
चालले रे मुक्याने, नि म्हणशील
त्याला मी 'मम' म्हणाले, तुझे
वागणे अन तुझे ते बहाणे, मला ना
कळाले तुझा दोष नाही !! -
सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

तुझा दोष नाही : क्रान्ति

तुझ्या पातिव्रत्यास
अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा,
तुझा दोष नाही! तुझ्या सोबतीला
कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना
प्रतिक्षा, तुझा दोष नाही तुझा
धर्म मानव्य, त्याला नसे
आकृतीबंध काही, नसे ग्रंथ, ना
चौकटी की न दीक्षा, तुझा दोष
नाही! तुझ्या मुक्त काव्यातही
छंद आहे, खुला बंध आहे कुणा लेख
वाटो, कुणाला समीक्षा, तुझा
दोष नाही! दिली लक्ष्मणाने
तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल
भिक्षा", तुझा दोष नाही! तुझी
तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा
तूच कैदी, तुझा तू गुन्हा अन्
तुझी तूच शिक्षा, तुझा दोष
नाही?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2528

डोळ्यात अडकली स्वप्ने.. : बहर

डोळ्यात अडकली स्वप्ने..
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच
विराणी.. हळवासा स्पर्ष तुझा
तो .. आठवतो आज तनूला.. अलवार बोल
अजुनीही.. मांडती तुझी
गाऱ्हाणी! तू गेल्यावर
जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने
ही अनवाणी! बागेतच फुलतो आता..
बाजार फुलांचा मोठा.. हा उदिम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! ही पुरे वर्णने आता,
ओघळणाऱ्या घावांची.. का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2529

Friday, February 4, 2011

डोळ्यात अडकली स्वप्ने.. : बहर

डोळ्यात अडकली स्वप्ने..
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच
विराणी.. हळवासा स्पर्ष तुझा
तो .. आठवतो आज तनूला.. अलवार बोल
अजुनीही.. मांडती तुझी
गाऱ्हाणी! तू गेल्यावर
जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने
ही अनवाणी! बागेतच फुलतो आता..
बाजार फुलांचा मोठा.. हा उदिम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! ही पुरे वर्णने आता,
ओघळणाऱ्या घावांची.. का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

तुझा दोष नाही : क्रान्ति

तुझ्या पातिव्रत्यास
अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा,
तुझा दोष नाही! तुझ्या सोबतीला
कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना
प्रतिक्षा, तुझा दोष नाही तुझा
धर्म मानव्य, त्याला नसे
आकृतीबंध काही, नसे ग्रंथ, ना
चौकटी की न दीक्षा, तुझा दोष
नाही! तुझ्या मुक्त काव्यातही
छंद आहे, खुला बंध आहे कुणा लेख
वाटो, कुणाला समीक्षा, तुझा
दोष नाही! दिली लक्ष्मणाने
तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल
भिक्षा", तुझा दोष नाही! तुझी
तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा
तूच कैदी, तुझा तू गुन्हा अन्
तुझी तूच शिक्षा, तुझा दोष
नाही?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

कधीकाळी तुझ्यासाठी : आनंदयात्री

मनाच्या खोल मातीने उन्हाळे
सोसले होते तरी मी पेरता
स्वप्ने ऋतु झंकारले होते
अबोला फार दिवसांचा तुझा हा
अन् तिथे माझ्या- घराच्या
स्वच्छ काचांवर धुके अंधारले
होते नसावी काय जगण्याला जरा
खोली, जरा रूंदी? तुम्ही
नुसतेच श्वासांचे मनोरे
बांधले होते कळीचे फूल होताना
तिथे मी नेमका होतो जणू चोरून
कवितेने कवीला गाठले होते! अहो
जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष
सांगा ना! असे बोलून पाठीवर
कुणाचे हो भले होते? तशी ती भेट
शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी
कवटाळले होते किती वाटायचे
मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही
आपले होते?) नको दुस्वास
दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते
सुखाने झोपले होते कधीकाळी
तुझ्यासाठी दिला मी जीवही
असता कधीकाळी तुझ्यासाठी
जगावे वाटले होते - नचिकेत
जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2506

एक पाखरु फांदीवर... : वैभव देशमुख

एक पाखरु फांदीवर फांदी हलते
खाली वर वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर भांडण होते
दिवसाशी चिडतो आपण रात्रीवर
पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर शाप किती
बनले त्यांचे दिलेत तू तर काही
वर त्यांचे बळ, त्यांची उर्जा
सरते भाषणबाजीवर जगणे भिजले
अश्रूंनी टाकू कुठल्या
दोरीवर चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2527

एक पाखरु फांदीवर... : वैभव देशमुख

एक पाखरु फांदीवर फांदी हलते
खाली वर वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर भांडण होते
दिवसाशी चिडतो आपण रात्रीवर
पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर शाप किती
बनले त्यांचे दिलेत तू तर काही
वर त्यांचे बळ, त्यांची उर्जा
सरते भाषणबाजीवर जगणे भिजले
अश्रूंनी टाकू कुठल्या
दोरीवर चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

Thursday, February 3, 2011

जन्मभर तुडवीन मी ... : वैभव देशमुख

जन्मभर तुडवीन मी रस्ता
उन्हाचा पण तुला स्पर्शू नये
ठिपका उन्हाचा पूर आला हे बरे
डोळ्यात झाले साचला होता किती
कचरा उन्हाचा मी जशी खिडकी
उघडली, आत आला केवढ्या वेगामधे
तुकडा उन्हाचा दग्ध ओठांनी
तुझ्या केसांमधे मी माळला
होता कसा गजरा उन्हाचा यामुळे
तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर रंग
नाही एवढा गोरा उन्हाचा घालतो
पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका
उन्हाचा राहते माझ्यासवे
छायेप्रमाणे जीव माझ्यावर
कसा इतका उन्हाचा दिवस गेला,
सांज ढळली पण अजुनही उडत आहे
मंदसा धुरळा उन्हाचा - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2526

Wednesday, February 2, 2011

जन्मभर तुडवीन मी ... : वैभव देशमुख

जन्मभर तुडवीन मी रस्ता
उन्हाचा पण तुला स्पर्शू नये
ठिपका उन्हाचा पूर आला हे बरे
डोळ्यात झाले साचला होता किती
कचरा उन्हाचा मी जशी खिडकी
उघडली, आत आला केवढ्या वेगामधे
तुकडा उन्हाचा दग्ध ओठांनी
तुझ्या केसांमधे मी माळला
होता कसा गजरा उन्हाचा यामुळे
तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर रंग
नाही एवढा गोरा उन्हाचा घालतो
पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका
उन्हाचा राहते माझ्यासवे
छायेप्रमाणे जीव माझ्यावर
कसा इतका उन्हाचा दिवस गेला,
सांज ढळली पण अजुनही उडत आहे
मंदसा धुरळा उन्हाचा - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

राजसा. : कमलाकर देसले

चेहरा मी तुझा वाचला राजसा
प्रेम आहे तुझी रे कला राजसा..
पुस्तकासारखे वाचले तू मला
चाळताना मला;भाळला राजसा..
चंद्रही तो नको.त्या नको तारका
स्वर्ग द्यावास बाहूतला
राजसा.. झोपडी छान ही
राजवाड्याहुनी शीव भोळा जणू
लाभला राजसा.. मेघधारा जणू रे
तुझा स्पर्श हा मोर माझ्या मनी
नाचला राजसा... ऊन
माथ्यावरी.तापला तू जरी गारवा
हा तळी घातला राजसा..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुझा दोष नाही : मयुरेश साने

तुझा दोष नाही गुन्हा मीच केला
पुन्हा प्राण माझा दग्यानेच
गेला नको चांदण्याचे उशाला
उखाणे सदा जागुनी सूर्य
डोळ्यात गेला तुझ्या सौख्य
हास्यात आनंद आहे मला कोणता
काळ जगवून गेला मला सोबतीला
सुन्या पायवाटा वरातीत
मेण्या तुनी जीव गेला दिले गीत
माझे तुझ्या मैफलीला तुझा
हुंदका दाद घेऊन गेला मयुरेश
साने .. दि...०२-फेब्रुवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

तुझा दोष नाही : क्रान्ति

तुझ्या पातिव्रत्यास
अग्नीपरिक्षा, तुझा दोष नाही
खरे नेहमी भोगती हीच शिक्षा,
तुझा दोष नाही! तुझ्या सोबतीला
कुणीही न येथे, तुझा आसरा तू,
तुझ्या सावलीला तुझी ना
प्रतिक्षा, तुझा दोष नाही तुझा
धर्म मानव्य, त्याला नसे
आकृतीबंध काही, नसे ग्रंथ, ना
चौकटी की न दीक्षा, तुझा दोष
नाही! तुझ्या मुक्त काव्यातही
छंद आहे, खुला बंध आहे कुणा लेख
वाटो, कुणाला समीक्षा, तुझा
दोष नाही! दिली लक्ष्मणाने
तुला रेघ आखून, तो मुक्त झाला,
तुझी संस्कृती सांगते, "घाल
भिक्षा", तुझा दोष नाही! तुझी
तूच बेडी, तुझी तूच कारा, तुझा
तूच कैदी, तुझा तू गुन्हा अन्
तुझी तूच शिक्षा, तुझा दोष
नाही?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/