Friday, February 18, 2011

तुझा दोष नाही !! : supriya.jadhav7

तुझा दोष नाही !! जरी कुंकवाचीच
अंतीम कक्षा, तुझा दोष नाही !
गळा पोत काळी रुळे... हीच
शिक्षा, तुझा दोष नाही !! कुणी
बोट दावी, कुणी बोलुनी होय
नामानिराळा, (तुझ्या
पावित्र्याचीच अग्नीपरिक्षा,
तुझा दोष नाही !!) कुठे
बाळ-श्रावण? कधी सर्प जागे
पिलेल्या दुधाला? तुझ्या
पाझराचा सदा भार वक्षा, तुझा
दोष नाही !! क्षणी पाठ दावी तुला
पाठचाही, कुणी ना कुणाचा... ,
तुझी ना करे "दोर कच्चाच"
रक्षा, तुझा दोष नाही !! भल्या
कोण वाली ? इथे दुर्गुणांची
घडे नित्य अर्चा, तुझ्या
सदगुणांचीच परखड समिक्षा,
तुझा दोष नाही !! -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment