का ढगांनी बरसण्याचे
टाळलेले..? नाचरे हे मोर आम्ही
पाळलेले ... त्या फ़ुलांनी
सोडलेले बहरणेही... का
कळ्यांचे स्वप्न त्यांनी
जाळलेले...? मीच घेतो
प्राक्तनाचा ठाव माझ्या
नेहमी मजला सुखांनी गाळलेले ...
राग मी करतो सखीच्या
कुंतलांचा माळले गजरे तयांनी
वाळलेले...! चोर का त्यांनी
म्हणावे लोचनांना ? हे नयन
त्या चेहर्यावर भाळलेले... आज
'वेडे', शब्द थोडे आळवावे रे
विशाला काव्य तूही चाळलेले...
विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2553
Monday, February 21, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment