Thursday, February 10, 2011

तुझा दोष नाही : मी अभिजीत

तुझा दोष नाही, तुझी चूक नाही
जळाने शमावी अशी भूक नाही कसे
धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही
लिलावी स्वतःलाच मांडेन
म्हणतो मला मोल माझेच ठाऊक
नाही जरा पाहता रोखुनी, ती
म्हणाली गझल तू करावीस; चेटूक
नाही कशाला कहाणी जगा ऐकवू मी
कुणी एवढा येथ भावूक नाही जरी
मानतो चौकटी काफ़ियांच्या
गझलकार हा कूपमंडूक नाही -- मी
अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment