बघून अनोळखी रस्त्यांना का
बावरली स्वप्ने आकळेना आता
कुठे ती दडून बसली स्वप्ने
होता झगमगाट रस्त्यावर
,देखावा गाड्यांचा डोळे दिपले
आणि जाळ्यात होती शिरली
स्वप्ने किंमत शब्दांची
माझ्या ना कळली तुला कधीही जीव
कसा माझा भिरभिरला ,किती
विखुरली स्वप्ने अजूनही या
मनात टिकून आहे वेडी आशा
केव्हा तू जादू केली अन ही
मंतरली स्वप्ने झुळुकेसवे
येईल इकडे सखया तुझी खुशाली
माळून ती श्वासात माझ्या पहा
हासली स्वप्ने चंद्राप्रमाणे
तू आहेस देखणा कळले मला ... त्या
गुलाबी रात्री लाजली अन
मोहरली स्वप्ने
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment