हो गझल गैरमुसलसल आता कोरडे
वागणे बदल आता चेहरा वेगळीकडे
केला घेतली आपली दखल आता एक
उडता कटाक्ष झिलमिलला ओळ
रचणार मी तरल आता मी तुझा वा
कधी स्वतःचा मी सारखे हेच
दलबदल आता केस कानावरून मागे
घे हाच मुद्दा पुढे ढकल आता हे
ठरवताच लाघवी हसते 'आज करतोच
बेदखल आता' चारचौघांपुढे विषय
आला काय देशील तू बगल आता
ढुंकुनी पाहणार नाही मी प्रेम
झाले जरी सफल आता एक पर्याय
राहिला नाही चालणे मजल दरमजल
आता सारखे हेच वाटते येथे
'संपली आपली सहल आता' 'काय समजून
घ्यायचे नक्की' काय होईल ही
उकल आता आजही गाजले इतर सारे
जाउदे 'बेफिकीर' चल आता
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2567
Monday, February 28, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment