ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत
नाही मला सोबती असतो सतत नी
धीर देतो सारखा पण चुका घडण्या
अगोदर थांबवत नाही मला एक दहशत
नांदते आहे पुन्हा गावामधे जी
घराबाहेर हल्ली पाठवत नाही
मला कोणता हा काळ पाठी घेवूनी
मी चाललो पेलवत नाही मला पण
सोडवत नाही मला हा नव्हे विवेक
माझा हि खरी असहायता धुमसते जी
आत केवळ पेटवत नाही मला उंच
टॉवर बांधण्यासाठी नसावे
सोयीचे याचसाठी तो घरातून
हुसकवत नाही मला बेगडी चेहराच
माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही
मला ढळतो मी अश्रू केवळ
जमाखर्च पाहुनी आसवांची गळती
रोजच परवडत नाही मला लाख तू
समजूत माझी घालण्याची शर्थ कर
लाघवी शब्दात हुकुमत जाणवत
नाही मला वाकलो देवासामोरी हा
खरेतर दृष्टीभ्रम वेदनांचे
बोचके बघ पेलवत नाही मला (मेरा
बदन बोझ से दुहरा हुवा होगा.....
मई सजदे में नहीं था आपको धोका
हुवा होगा.. ......दुष्यंतकुमार )
....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2521
Sunday, February 6, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment