वेढुनी आवेग माझा रोज
गाभुळतेस तू पण तुला ओलावतो
तेव्हा मनी नसतेस तू मी मला का
आवडावे ही समस्या संपली की
तुला सांगेन मी की खूप आवडतेस
तू शोधतो माझ्या खुणा विझत्या
निखार्यातून मी जाळुनी
हासून निमिषार्धात ओसरतेस तू
दर्शनासाठी असभ्यासारखा
खोळंबतो आणि सभ्यासारखी
पडद्यातुनी बघतेस तू चांगले
काहीच नाही आपल्या दोघांमधे
एवढे जर सोडले की चांगली
दिसतेस तू मीलनाची रात सारी
कोरडी जाऊनही नीट वागवतेस
दिवसा, हे कसे करतेस तू? तू तसे
केलेस की मी नाकही घासायचे मी
अबोला पाळला की 'बेफिकिर'
म्हणतेस तू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2532
Tuesday, February 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment