Saturday, February 12, 2011

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे : मी अभिजीत

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
काळोख जो जगाचा, माझी प्रभात
आहे आताच मैफलीचा मी वर्ज्य
सूर झालो माझ्याशिवाय गाणे
तालासुरात आहे गेलो निघून
डोळे ठेवून कोरडे मी माझ्याच
आसवांचे पाणी घनात आहे
गोंजारतो अताशा माझ्याच
वेदना मी सांगा तरी नशा ही
दुसर्‍या कशात आहे खेळात या
नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात
आहे -- मी अभिजीत
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2539

No comments:

Post a Comment