Tuesday, February 22, 2011

अस्ता॑चली रवी : विकास सोहोनी

अस्ता॑चली रवी मी विझता॑ना
पहात होतो । पाऊल खुणा माझ्या
मिटता॑ना पहात होतो ॥१॥ तो गाज
सागराचा ऐटी ऽ त लाट होती ।
लाटेस किनार्‍यासी विरता॑ना
पहात होतो ॥२॥ मोहात मी
कितिकदा फसलो नि बुडलो होतो ।
लाटा॑त किनार्‍याला बुडता॑ना
पहात होतो ॥३॥ या अथा॑ग
सागराचा तो अल्पसा किनारा ।
मिलनाचे निकष सारे तुटता॑ना
पहात होतो ॥४॥ अमर्याद साठे
कोठे इतरा॑ना थे॑ब ही ना ।
व्याकुळ जीव जना॑चे जगता॑ना
पहात होतो ॥५॥ होडीत सागराची
आणून नित्य दौलत । कोणा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥६॥ जलदा॑परी मी व्हावे जीवन
जना॑स द्यावे । मी ढगा॑स
सागराला लुटता॑ना पहात होतो
॥७॥
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment