Wednesday, February 9, 2011

विमान माझे तयार होते ! : मयुरेश साने

खरेच का ? चांदणे तुझे- ते -मला
कधी भेटणार होते ! हजार वणवे
उरात माझ्या - चितेवरी पेटणार
होते ! "समाज भिंती " सपाट करुनी -
जरा तुझ्या अंगणात आलो ! नव्या
नव्या तोरणात नटले - मला तुझे -
बंद दार होते ! तुला दिली "ती" !
फुलेच नव्हती - "ऋतु - ऋतुंचे
सवाल" होते ! अनेकदा "मोहरुन"
गेलो - हवे हवेसे - नकार होते !
हसून देईन कारणे - का ? रडावयाला
उशीर झाला ! "सऋद्य" जे वाटले
तयांचे - जिवंत ठोकेच ठार होते !
* ( "सऋद्य" - सर्‍हुदयी -
संवेदनशील- भावनाप्रधान )
जिवंत होतो -जगून गेलो -
मरावयाला जिवंत आहे ! विसंबुनी
राहिलो कसा ? मी - तिने दिले
"शब्द चार" होते ! सुळावरी दे
मला ! तरीही इमान माझे प्रमाण
आहे "तुका" ! "विठोबा" उभे कधीचे -
विमान माझे तयार होते !
.............मयुरेश साने....दि...९-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment