*||गिधाडे||* भोवति गिधाडांचाच
घोळका सारा होता श्वासांवर
माझ्या जागता पहारा होता ||
सोसून आयुष्य अवघे, पोसून
जगविले त्यांना माझे
रक्तमांस हाच तर त्यांचा चारा
होता || चांगुलपणा होता की ,
केला नादान मुर्खपणा गरळ
ओकणारा, अस्तनीत निखारा होता.||
धूर्त नात्यांच्या मायेचा
मायावी बाजार हा मोडकी माझी
तिरडी, पांगळा सहारा होता. ||
संधीसाठी नेहमीच टपून होती ही
गिधाडे अंतयात्रेतही
त्यांचीच गर्दी , काय तो नजारा
होता.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, February 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment