Wednesday, February 23, 2011

जखमेस ओल आली.... : निरज कुलकर्णी

जखमेस ओल आली.... एकांत रूक्ष
माझा, फेटाळतो जरा मी... गर्दीत
माणसांच्या, रेंगाळतो जरा मी...
मज जिंकण्या मिळावा, का वाव ना
कधीही?? नुसत्या 'पराभवाला',
कंटाळतो जरा मी... डोळ्यांत
साठलेली, स्वप्नें तहानलेली...
निद्रेस टाळताना, ओशाळतो जरा
मी... चौफेर गोठलेला, अंधार
जीवघेणा... आयुष्य शोधताना,
ठेचाळतो जरा मी... मधुमुक्त
वागण्याचा, उलटून काळ गेला!
त्या रम्य आठवांना, कवटाळतो
जरा मी... तुज पाहूनी समोरी,
जखमेस ओल आली... स्वर्गीय
वेदनांना, सांभाळतो जरा मी...
आभार यातनेचे, मानून मी जराशे;
आभास हे तुझे मग, परिमाळतो जरा
मी... - निरज कुलकर्णी.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment