Wednesday, February 2, 2011

राजसा. : कमलाकर देसले

चेहरा मी तुझा वाचला राजसा
प्रेम आहे तुझी रे कला राजसा..
पुस्तकासारखे वाचले तू मला
चाळताना मला;भाळला राजसा..
चंद्रही तो नको.त्या नको तारका
स्वर्ग द्यावास बाहूतला
राजसा.. झोपडी छान ही
राजवाड्याहुनी शीव भोळा जणू
लाभला राजसा.. मेघधारा जणू रे
तुझा स्पर्श हा मोर माझ्या मनी
नाचला राजसा... ऊन
माथ्यावरी.तापला तू जरी गारवा
हा तळी घातला राजसा..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment