Wednesday, February 16, 2011

कोणता जन्म इथे सांग??? : मयुरेश साने

कोणता जन्म इथे सांग -
हासण्यासाठी ? घेतले श्वास "मी"
- जिवंत - भासण्यासाठी ! ओळखीचेच
कुणी आज मला भेटावे ओळखीचाच
मिळो फास - संपण्यासाठी ! रे !
वसंता मला नकोत फुलांच्या
हाका चाललो मी इथे - मुळी न
थांबण्यासाठी माळ माझेच
ह्रुदय - मोकळ्या केसांमधुनी
जीव उरला कुठे तुझ्यात
गुंतण्यासाठी ! कोणता शब्द
तुला देऊ सखे सांग मला ? दोन
डोळे दिलेत प्रेम
उमजण्यासाठी व्रण झालेत जुने
वेदना तरीही नवी अश्रु येती
अजून प्रेम सांडण्यासाठी
मयुरेश साने..दि...१६-फेब-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment