हे का घडू नये,अन ते का घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
शेंदूर फासती का,आम्हास लोक
हे? हा प्रश्न दगड-धोंड्यांना
का पडू नये? उठसूठ मुख्यमंत्री
दिसतात मंदिरी का देव
अंतरी,त्यांना सापडू नये?
पाषाण तो जरी ही,पाहूनि अप्सरा
छातीत निष्ठुराच्या का धडधडू
नये? हसतात सातमजली, लाखोलि
वाहुनी ''कैलास''ने शिवीही,का
हासडू नये? --डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2551
Saturday, February 19, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment