*मी डाव मांडलेला........* जिंकून
हारण्या तो... मी डाव मांडलेला
तो खेळवून गेला... हा जीव
बांधलेला चालून आज आले...त्या
दूरच्याच वाटा भेटेल का
किनारा....वाराच थांबलेला
टांगून रात गेली....सूर्यास आज
दारी अंधार दाटलेला.... तो चांद
भांडलेला कोणास हाक मारू.. तो
गाव दूर गेला हुंकार वेदनेचा
.....कंठात सांडलेला पोळून रान
गेले ..ग्रीष्मात तो गळाला
माझ्याच काळजाचा.. तो दाह
नांदलेला मनिषा नाईक..........(माऊ)
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Tuesday, December 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment