आज भारंभार झाली आसवे !!! . *
पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा 'गद्दार' झाली आसवे ! *
साजणाचे ओठ गाली टेकता, लाजरा
शृंगार झाली आसवे ! * झोंबरे
होते तडाखे वादळी, मिट्ट्सा
अंधार झाली आसवे ! * लाळघोट्या
भेकडांच्या मैफ़िली, पेटता
अंगार झाली आसवे ! * आपुल्यांचे
घाव पाठी झेलता, आज भारंभार
झाली आसवे ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2454
Thursday, December 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment