Thursday, December 2, 2010

बघ तुझ्या येण्यामधे हे केवढे मांगल्य आहे : विजय दि. पाटील

भाकरीची भ्रांत नाही, भूक
मेली...शल्य आहे रंगलेल्या
जीवनाचे हे खरे वैफल्य आहे
वाजती कानात माझ्या
प्रार्थनेचे सूर मंजुळ बघ
तुझ्या येण्यामधे हे केवढे
मांगल्य आहे गंधवेडया
भावनांची अंतरी हो झुंडशाही
दुश्मनांचे पण फुलांवर नेमके
प्राबल्य आहे जायचे नाही
कधीही दु:ख आयुष्यातले जर
कोणता उद्देश करते साध्य
व्रत-वैकल्य आहे? ऐहिकाची जी
भुतावळ स्वार आहे ह्या मनावर
मी कसा झटकू?...मला साधायचे
कैवल्य आहे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2452

No comments:

Post a Comment