Saturday, December 4, 2010

मरण्यात अर्थ नाही : गंगाधर मुटे

*मरण्यात अर्थ नाही* संवेदनेत
आता, जगण्यात अर्थ नाही जाळून
या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
माझे आता वळून मागे, बघण्यात
अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे,
शिखरास गाठती जे आता पुढेच
जावे, हटण्यात अर्थ नाही ही
खिंड राखताना, मृत्यूसवे
लढावे जखमांस घाबरोनी,
पळण्यात अर्थ नाही हो अभय
एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात
अर्थ नाही गंगाधर मुटे
.......................................
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment