Thursday, December 16, 2010

उठोनी झुकावी तुझी पापणी अन.... !!! : supriya.jadhav7

उठोनी झुकावी तुझी पापणी अन....
!!! उठोनी झुकावी तुझी पापणी अन,
निशा मत्त व्हावी, नशीली नशीली
'अदा' जीवघेणी, सजा सक्त
व्हावी ! खळाळे झरा की, जणू
पैंजणांचीच आमंत्रणे ही,
तुझ्या हासण्याने सुरांची
स्वरालीच अव्यक्त व्हावी !
कुण्या जर्जराला तुझी ऐकु
येताच मिठ्ठास वाणी, न व्याधीच
फ़क्त, स्वयं कोकिळाही तुझी
भक्त व्हावी ! फ़िका सूर्य भासे,
ऋतूंनी लवूनी तुला अर्ध्य
द्यावे, तुझ्या चालण्याने
थिजावी पृथाही, नि आसक्त
व्हावी ! जरा राहू दे ना सखे
मोरपंखी तुझा हात हाती, तुझ्या
स्पर्शण्याने फ़ुलावी अबोली,
नि आरक्त व्हावी ! कधीचा,
कितीदा प्रिये तिष्ठलो मी
तुझा कौल घेण्या, कळेना,सुचेना
युगांची तृषा ही कशी व्यक्त
व्हावी ! -सुप्रिया (जोशी) जाधव
(मतल्यातील काफियात एक छोटीशी
सूट घेतली आहे).
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment