Monday, December 20, 2010

लोक हरवले होते......... : स्नेहदर्शन

जगात सार्‍या फिरता फिरता खूप
सोसले होते परके होउन मलाच
माझे तीर टोचले होते एक किनारा
दिसला नाही,नाही दिसली नौका
सागरात मग होत राहिला
अश्रुंचा ही धोका. कुठे बघावे
कळले नाही लोक हरवले होते.........
तुझी नी माझी सोबत गेली
स्वप्नांची ही माती कुणास
बोलु सखा सोबती कशास जोडू नाती
मला बघोनी व्यथेस तेंव्हा दु:ख
जाहले होते........ मला सोडुनी
कोणी माझ्या सोबत वाळले नाही
मीच राहिलो माझा कैसा मलाच
कळले नाही एकाकीपण दैवाने मज
असे वाहिले होते........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment