काल मी मृत्युस माझ्या
बोलावले अन पहाटे दार त्याने
ठोठावले || काल तु आलास नाही
बोलावुनही पण स्वतःला मी जरा
समजावले || मैफील रंगलीच होती
काल रात्री दु:ख होते प्यालात
सारे सामावले || भरुनि त्याचा
पेग वदलो "बैस मित्रा"
नसण्याने तुझ्या दु:ख हे
सोकावले || काल मैफीलीत मी याद
तुझी काढली जगण्यात व्यसनी
लोक ते ,धास्तावले || पहिलाच
प्याला उचलता तो म्हणाला एक
"साकी"स हे गीत होते भावले ||
दोस्तहो वाहवा जरी आली न
तेव्हा नेत्र ह्या
मित्राचेही होते ओलावले ||
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, December 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment