गुलाबी गाव होते, ताटवे चौफेर
होते जिथे मी पोचलो तेथे तुझे
माहेर होते मला पाहून
विरघळतेस हे माहीत आहे तसे
आतून होते का जसे बाहेर होते?
मला डोळे मिटावे लागले ही बोच
नाही कुठे आहेस तू हे शोधणारे
हेर होते तुझी गोडी, तुझ्या
गोडीपुढे आला दुरावा मला जे
भेटले ते सर्व सव्वाशेर होते
मला उद्विग्नता आली तुला
पाहून तेव्हा तुला आले तुझ्या
लग्नात ते आहेर होते 'अबोला
पाळणे मी' हा इथे ठरतो तमाशा
जरासा व्यक्त झालो की म्हणे
'हे थेर होते' तुझ्या
प्रत्येकवेळी हासण्याने
डळमळे मी मला वाटायचे 'सारे
हझलचे शेर होते'
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2466
Wednesday, December 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment