डोळ्यात अडकली स्वप्ने..
रक्तात हरवली गाणी.. हा चंद्र
पुन्हा पुनवेचा.. ही फिरून तीच
विराणी.. हळवासा स्पर्ष तुझा
तो .. आठवतो आज तनूला.. अलवार बोल
अजुनीही.. मांडती तुझी
गार्हाणी! तू गेल्यावर
जाणवले.. तू जाता जाता मागे..
ठेवलेस आसवमोती.. अन स्वप्ने
ही अनवाणी! बागेतच फुलतो आता..
बाजार फुलांचा मोठा.. हा उदिम
'वेगळा' आहे, सोडुन जनरीत
पुराणी! ही पुरे वर्णने आता,
ओघळणार्या घावांची.. का
कथा-व्यथा सांगावी? जखमांची
तीच कहाणी! -- बहर. ३१/१२/२०१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Friday, December 31, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment