Wednesday, December 29, 2010

अबोला गाजला होता : मयुरेश साने

तुला पाहून माझा शब्द - तेव्हा
लाजला होता मुका राहुनही मझा -
अबोला गाजला होता तुझा तो
स्पर्श चंदेरी -तुझा तो हात
पुनवेचा उन्हाचा हात ही माझा -
अचानक भाजला होता जरी बेताल मी
आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा
तिने सौंदर्य वर्खाचाच -
प्याला पाजला होता तुझा
मुखचंद्रमा पाहून मुखडा
गाइला होता चेहरा रोजचा दु:खी -
सुखाने माजला होता असे
स्वप्नात ही व्हावे ? तुला मी
फूल देताना घड्याळातून
काटेरी -गजर ही वाजला होता मला
पाहून आताशा - म्हणे हा आरसा
मजला असा मयुरेश नाही पाहिला -
जो आजला होता. मयुरेश
साने...दि...२९-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2478

No comments:

Post a Comment