Wednesday, December 8, 2010

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या.. : बहर

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या
बसतो.. पडतात कवडसे..त्यांना
पाहुन हसतो.. ओंजळीत आहे
पुरचुंडी स्वप्नांची.. ती घेऊन
जेथे जागा मिळते..बसतो.. देतात
दिलासे ऋतुही जाता जाता.. मी
आता केवळ त्यांना पाहुन हसतो..
गर्दीत मिसळतो..गर्दी होऊन
जातो..
चालतो..हासतो..जातो..येतो..बसतो..
तू वचने दे..आश्वासन.. आणा-भाका..
मी निमुटपणाने त्याच्यावर
विश्वसतो.. शिषिरागम आहे 'बहर'
कोठुनी यावा? स्वप्नांची पाने
गळती..वेचीत बसतो..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2460

No comments:

Post a Comment