Thursday, December 2, 2010

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती! : क्रान्ति

जातात वृक्ष वादळात, तरती
पाती, आभाळ पेल तू, नकोस विसरू
माती प्रत्येक पावलागणिक बेट
काट्यांचे, माझीच पैंजणे दगा
देउनी जाती केव्हाच सोडली
माझी वाट दिव्यांनी, अंधार
एकला जन्माचा सांगाती पाने
निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी
नाती तहहयात माझे निशाण शुभ्र,
(तहाचे), बंडाचा झेंडा कधीच
नव्हता हाती!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2453

No comments:

Post a Comment